Rain Damaged corn 
छत्रपती संभाजीनगर

पोटाला चिमटा घेत खरिपाची पेरणी, पण पावसामुळे पिके गेली हातातून

सचिन चोबे

सिल्लोड (जि.जालना) : निसर्गाच्या लहरीपणाने क्षणार्धात होत्याचे नव्हते केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला. शनिवारी (ता.१९) रात्रीच्या सुमारास सिल्लोड तालुक्यात झालेल्या तासभर वादळीवाऱ्यासह पावसाने अनेक गावांतील खरिपाची उभी पिके जमीनदोस्त झाली.

गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ ठप्प झाली, शेतमालास भाव नाही. पोटाला चिमटा घेत खरिपाची पेरणी केली. पीक काढणीला येत असतांनाच झालेल्या वादळीवारे व पावसाने पीके हातची गेली आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास उभारी द्यावी तरी कोठे-कोठे असा प्रश्न निर्माण होत आहे. मागील वर्षी देखील परतीच्या पावसाने शेतमाल हातचा गेला. शासनाने तोडकी मदत केली, तर हक्काच्या पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. पावसाने देखील सुरवातीपासून तालुक्यात कहर केला आहे. गेल्या महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, आता नुकसानीच्या सुरू असलेल्या पावसाने देखील होत्याचे नव्हते केले आहे.

निसर्ग कोपला
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर्व हंगामी मिरची लागवड होते. सुरवातीपासून झालेल्या पावसामुळे मिरचीच्या उत्पन्नास फटका बसला. नगदीचे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. परंतु यावर्षी लागवड कमी झाल्याने व उत्पादनात घट झाल्याने भाव चांगला मिळत होता. मात्र त्यावरही गेल्या महिनाभरापासून कोकडा रोगाचा मिरचीचे पीक देखील हातचे गेल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले आहे. त्यात आता शेतकऱ्यांना आशा लागलेल्या मका, कपाशी देखील फटका बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Mane Resigns : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांना मोठा धक्का; मानेंनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, अजितदादांच्या पक्षात करणार प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar Crime: तक्रारदारच निघाला आरोपी; व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी लुटीचा बनाव

Latest Marathi News Live Update : खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज सामुहिक गीता पठणाचे आयोजन

Nagpur News: गडकरी प्रमुख पाहुणे असताना स्टेजवर दोन महिला पोस्टमास्टरमध्ये धक्काबुक्की अन् शाब्दीक खटके; नेमकं काय घडलं?

१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

SCROLL FOR NEXT