आपेगाव - कुरणपिंप्री पुल sakal
छत्रपती संभाजीनगर

Rain: दहा वर्ष उलटली तरीही...आपेगाव - कुरणपिंप्री गावांचा तुटलेला संपर्क जोडला जाईना... !

हबीबखान पठाण

Pochad News: सन २००२ मध्ये चाळीस कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पुलालगत वाळु तस्करांनी बेसुमार उत्खनन केल्याने आपेगाव (ता.पैठण) चा पालखी पूल खचून दहा वर्षापासून गेवराई व पैठण तालुक्याचा संपर्क तुटुन नागरिकांना पावसाळ्यासह हिवाळा ऋतुत दोन किलोमिटरचा वळसा घालुन तर उन्हाळ्यात कमरे इतक्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करीत गावांत जावे लागते.

एवढेच नव्हे अलिकडील तिन वर्षापासून सलगरित्या दुथडी भरून आपेगाव बंधाऱ्यात पाणी साठलेले असल्याने कायमच दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र पाहवयास मिळत असून शनिवारी (ता.२९) आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या दिंड्याला पाण्यातून मार्गस्थ व्हावे लागणार आहे.

ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव (ता.पैठण) व पुर्वी गेवराई तालुक्यात असलेल्या कुरणपिंप्री या दोन्ही गाव व तालुक्यास जोडण्यासाठी गोदावरी नदीवर आपेगाव बंधाऱ्यापासून थोड्याच अंतरावर सन २००२ मध्ये चाळीस कोटी खर्चुन ३८० मिटर लांबीचे सिमेंट कॉक्रीटचे भव्य पुल उभारण्यात आले होते.

दोन गावच नव्हे तर दोन तालुक्याचा संपर्क जोडण्यासाठी उभारण्यात आलेला हा पूल ता. आठ नोव्हेंबर २०१४ रोजी गोदावरीतील पुलाच्या पायथ्याशी बेसुमार वाळू उत्खनन केल्यामुळे खचून पूर्णत: जमिनीवर कोसळला व दोन्ही तालुक्यासह सभोवताच्या गावांचा कायमचा संपर्क तुटला. सन २००२ मध्ये उभारण्यात आलेल्या या पुलाचे आर्यूमान बांधकाम विभागाच्या अनुमानाने ऐंशी वर्षाचे होते.

मात्र गोदावरी पात्रातून प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन भूमिकेमुळे वाळूतस्कारांनी अहोरात्र वाळू उपसा करून अवघे पुलाचे पायाभरणी चे कठडेच उघडे पाडले व ऐंशी वर्ष आर्यूमान असलेला हा पूल अवघ्या अकरा वर्षात खचला अन् गेवराई व पैठण तालुक्याचा कायमचा संपर्क तुटला. पाऊस नसेल तर नागरिक पर्यायी रस्ता शोधून गोदावारीतून दळणवळण करतात. मात्र पावसाळ्यातील भीती, हिरडपूरी व आपेगाव बंधाऱ्याला सुटलेले पाणी त्यांच्या मनात कायम घर करून असते. एवढेच नव्हे तर दरवर्षी पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या दिंड्या व पालख्याना या गोदावरीच्या पाण्यातून वाट काढत प्रस्थान करावे लागते. हा पूल कोसळून दहा वर्षाचा काळ उलटत आला, परंतु अद्यापही ग्रामस्थांसह भाविकांच्या दैना कायम आहेत.

सात वर्षापुर्वी या ठिकाणी नुतन पुल उभारणीसाठी नऊ कोटी रुपये मंजुर होऊन पुल उभारणीच्या कामास आपेगावच्या बाजूने सुरवात झाली व हे काम ऐन गोदावरीच्या मध्यभागी जाऊन सहा वर्षापासून बंद पडले आहे. पुलाचे कॉलम उभे राहिले मात्र ते केवळ शोभेचे वास्तु म्हणून. एवढेच नव्हे तर अद्याप न नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली न गोदावरी पात्रातील वाळूचा उपसा थांबविण्यात आला. आपेगाव व कुरणपिंप्री ही दोन्ही गावे गोदावरीच्या काठावर ओसलेली असल्याने पावसाळ्यात नागरिकांना गोदावरीतील पूर ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नसतो.

दहा वर्षापासून केवळ हे पूल उभारणीचा गाजावाजा होऊन त्याच्या पुर्णत्वाच्या निधीसाठीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडलेला असून अद्यापही या प्रस्तावाला गती प्राप्त झाली नसल्याचे सांगितले जाते. मागील अतिवृष्टीचे तिन वर्षे या गांवाच्या ग्रामस्थासाठी खुपच त्रासदायक ठरले आहे. वर्षभर हिरडपुरी व आपेगाव बंधारे पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने नागरिकांना दोन किलोमिटरचा फेरा घेऊन आपेगाव बंधाऱ्याच्या दरवाजावरून दळणवळण करावी लागते.

येथून अवजड वाहने गावांत जाऊ शकत नसल्याने गेवराई, चकलांबामार्गे वीस किलोमिटरचा वळसा घेत कुरणपिंप्री, गेवराई गाठावी लागते. आपेगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून या ठिकाणी राज्यभरातील भाविक संत ज्ञानेश्वर महाराजाच्या जन्मभूमीत दर्शनासाठी येतात. शासनाने आठ वर्षापुर्वी पैठण व आपेगाव प्राधिकरणासाठी अडीचशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता, मात्र या भुईसपाट झालेल्या पुलाच्या उभारणीसाठी कुणीच पावले न उचलल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. गत दहा वर्षापासुन मानकरी दिंडयाना गोदावरी नदी पात्रातुन कमरे इतक्या पाण्यातून वाट शोधत आषाढी एकादशीला पंढरपुरकडे प्रस्थान करावे लागते हे विशेष.

रुख्सानाबी कठ्ठू पटेल (सरपंच, कुरणपिंप्री), 'वाळूच्या अवैध उत्खननामुळे दहा वर्षापूर्वी पैठण-गेवराई तालुक्यास जोडणारा महत्त्वाचा पुल भुईसपाट होऊन दोन्ही गावांचा कायमचा संपर्क तुटला. हा पुल बारमाही रहदारी व दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पुल आहे. नवीन पुलाचे काम अर्ध्यावरच बंद पडून समस्या कायम आहे. तातडीने या पुलाचे काम पुर्ण न झाल्यास ग्रामस्थ व भाविकांच्या जनभावनेचा आदर करीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT