Red Water Sakal
छत्रपती संभाजीनगर

पावसाच्या पाण्याच्या नावाखाली शेंद्रा औद्योगिक वसाहतीतुन लाल पाण्याचा पूर

गेल्या दोन-तीन दिवसांपासुन पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांकडून केमिकल्स युक्त लाल पाणी ओढ्याला सोडण्यात येत आहे.

संतोष शेळके

गेल्या दोन-तीन दिवसांपासुन पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांकडून केमिकल्स युक्त लाल पाणी ओढ्याला सोडण्यात येत आहे.

करमाड (जि.औरंगाबाद) - गेल्या दोन-तीन दिवसांपासुन पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांकडून केमिकल्स युक्त लाल पाणी ओढ्याला सोडण्यात येत आहे. त्यामुळे या ओढ्याला लाल पाण्याचा पूर आल्याचा भास होतो. दरम्यान, यामुळे कुंभेफळ (ता. औरंगाबाद) ग्रामस्थांना मात्र पुन्हा एकदा मोठ्या आरोग्य संकटांस तोंड द्यावे लागू शकते असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.

औद्योगिक वसाहतीतून वाहणाऱ्या या ओढ्याचे पाणी कुंभेफळ गावातून थेट तालुक्यात सर्वाधिक मोठ्या गणल्या जाणाऱ्या सुखना धरणात जाऊन मिसळते.

या धरणातुन पंचक्रोशीतील चाळीस गावांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने काही वर्षापुर्वी या लाल पाण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बैठकीतही हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. सदरील पाणी हे केमिकल मिश्रीत असल्याने ते कुंभेफळ गाव शिवारात असलेल्या हातपंप व विहिरीत मिसळल्याने येथील हजारो ग्रामस्थांना साथीच्या विविध आजारांना सामोरे जावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. तथापि, मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर हे पाणी बंद झाले होते.

दरम्यान, कुंभेफळ (ता.औरंगाबाद) व शेंद्रा औद्योगिक वसाहत परिसरात बुधवारी (31 ऑगस्ट) व गुरुवारी (ता. एक) सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. दरम्यान, यामुळे एमआयडीसीतुन वाहणाऱ्या ओढ्याला चांगलेच पाणी वाहिले. या पुराच्या पाण्यासोबत कंपन्यांचे केमिकल्स युक्त लाल पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहिले. शनिवारी (ता. तीन) तर पावसाचा अगदी थोडा शिडकावा झाला. मात्र, ओढ्याला फूट भर लाल पाणी वाहत असल्याने हा चर्चेचा विषय ठरला. जालना महामार्गावरील पुलाखालुन वाहणारा हा लाल पाण्याचा पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पादचाऱ्यांसह वाहनधारक वाहन थांबवून वाहणारे लाल पाणी बघत आश्चर्य व्यक्त करीत होते. दरम्यान, यामुळे कुंभेफळ ग्रामस्थांत पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या गंभीर बाबींची त्वरीत दखल घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT