पर्जन्यवृष्टीसाठी ज्योतीनगरात महायज्ञ
ज्योतीनगर, ता. ५ ः दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पर्यावरण शुद्धीसाठी वैदिक मंच, सनातन धर्म प्रेमी, पतंजली समिती व योग कक्षा ज्योतीनगर यांच्यातर्फे पर्जन्यवृष्टी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा यज्ञ गुरुवार (ता. आठ) पाच दिवस चालणार असून, सकाळी सहा ते साडेआठ आणि सायंकाळी ५ ते ७ः३० अशी यज्ञाची वेळ आहे. विश्वरूप हॉलच्या मागे, महापालिकेच्या मैदानावर ५ बाय ५ फुटांचे यज्ञकुंड तयार करण्यात आले आहे. पर्जन्यवृष्टीसाठी ७० प्रकारच्या औषधीयुक्त जडी-बुटींपासून विशेष सामग्री आणि सोमरसासाठी २६ प्रकारच्या जडी-बुटींचा वापर केला जात आहे. आंबा, पिंपळ, वड, पळस आदी वृक्षांच्या समिधा आणि सोमरसाची शतधार सोडण्यात येत आहे. हरियाणाचे स्वामी शांतानंदजी आचार्य यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्याच सुमधुर आवाजातील रेकॉर्डेड मंत्रोच्चारात हा विधी होत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन दांपत्य नियमानुसार आहुती देऊ शकतात. मदत करू इच्छिणाऱ्यांनी रूपेंद्र गोरे (मो. ८२७५२३०८६३) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन योग गुरू सुभाष वेदपाठक, डॉ. सुजाता करजगावकर, अंजली आयाचित, मोना राजपूत यांनी केले आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.