‘रायरेश्वर’च्या विद्यार्थ्यांचे
ॲथलेटिक्स स्पर्धेत यश
-जिल्हास्तरीय चॅम्पियनशिपसाठी १९ विद्यार्थ्यांची निवड
परभणी, ता. ४ ः रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. एकूण १९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
१४, १७ व १९ वर्षांखालील विविध वयोगटांत विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली. १४ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या प्रकारात महेश राजेश नरवडे याने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर धावण्यात अभय प्रशांत शिंदे याने प्रथम, तर २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. दीपक तुकाराम कुरुडे याने ४०० व ८०० मीटर धावण्याच्या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत विशेष कामगिरी केली. लांब उडीमध्येही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले. १४ वर्षांखालील मुलांमध्ये यशराज कल्याण सिराळ, १७ वर्षांखालील मुलांमध्ये शिवराज अशोकराव लावंडे, तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये स्वराज उद्धव भिसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटातही रायरेश्वर विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले. १७ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर धावण्यात रोहिणी रमेशराव हरकळ, २०० मीटरमध्ये श्रीषा सुनीलराव देशमुख, तर १५०० मीटर धावण्यात पूनम भगवानराव तिठे हिने प्रथम क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलींच्या १५०० मीटर व ३००० मीटर धावण्याच्या प्रकारात सायली राजेंद्र भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलींच्या ३००० मीटर धावण्यात पूनम भगवानराव तिठे प्रथम, तर रिया रवींद्र चव्हाण द्वितीय आली. १९ वर्षांखालील मुलींच्या ३००० मीटरमध्ये सायली राजेंद्र भोसले प्रथम, तर सारिका भोजणे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक प्रकारात श्रेया हनुमान गायकवाड हिने द्वितीय क्रमांक पटकावला. क्रॉस-कंट्री प्रकारातही विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. ४ किलोमीटर क्रॉस-कंट्रीमध्ये पूनम भगवानराव तिठे हिने द्वितीय, तर सायली राजेंद्र भोसले हिने तृतीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.