Raj Thackeray esakal
छत्रपती संभाजीनगर

म्हाडाचा पेपर फुटला, पण पेपर फोडणारे अद्याप फुटले नाही : राज ठाकरे

राज्य सरकारचा वचक नसल्याने अशा पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : राज्यात एखाद्या परिक्षेचा पेपर फुटणे ही घटना काही पहिल्यांदा घडलेली नाही. परंतु, नुकताच म्हाडा पूर्वपरीक्षेचा पेपर फुटी प्रकरणी भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. (MNS Chief Raj Thackeray On Mhada Exam Paper Leack ) ठाकरे म्हणाले की, म्हाडाचा पेपर फुटला पण, पेपर फोडणारे अद्याप फुटले नाही, असेही ते राज ठाकरे म्हणाले. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. (Raj Thackeray In Aurangabad Tour for Upcoming corporation Election )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम ते या दौऱ्यातून करत असल्याचं दिसतं आहे. राज ठाकरे यांनी यावेळी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नसल्याचं सांगितलं.

राज्यात एखाध्या परिक्षेचा पेपर फुटणे ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. मात्र, नुकत्याच फुटलेल्या म्हाडाच्या पेपर फटी प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, परिक्षेचा पेपर फुटला पण पेपर फोडणारे अद्यापही फुटले नाही. राज्य सरकारचा वचक नसल्यामुळेच अशा पेपर फुटीच्या घटना वारंवर घडत असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Winter Fashion: हिवाळ्यात 'कम्फर्ट' आणि 'स्टायलिश' राहायचंय? मग स्मिता शेवाळेच्या खास टिप्स फॉलो करा!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

SCROLL FOR NEXT