छत्रपती संभाजीनगर

राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा रद्द काय आहे कारण

शेखलाल शेख

औरंगाबाद : हिंदुत्वाची भूमिका घेत झेंड्यात बदल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची सर्वच मनसे समर्थक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रकृती चांगली नसल्याने राज ठाकरे यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. 
या दौऱ्यात औरंगाबादसह मराठवाड्याच्या अनेक भागातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी जे मनसेत प्रवेश करण्यास आतुर होते. आता त्यांना आणखी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.

मुंबईतील मनसेच्या पहिल्याच अधिवेशनात एनआरसी, सीसीएसह प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला नवी उर्जा देण्याचे काम केले. महाअधिवेशन यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठवाड्यात पहिला दौरा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महाअधिवेशनातच मनसेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना थांबण्यास सांगण्यात आले होते. मराठवाड्यातील दौऱ्यातच या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेत हवा निर्माण करण्याचा यातून मनसेचा प्रयत्न होता. लातूर येथील कृषी नवनिर्माण प्रदर्शनाच्या उद्घाटनाने राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरूवात होणार होती.

परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने राज ठाकरे यांनी आपला मराठवाडा दौरा तुर्तास रद्द केल्याचे समजते. काल मुंबईतील रंगशारदा सभागृहात 9 फेब्रुवारी एनआरसी, सीसीएच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठीच्या बैठकीतून देखील राज ठाकरे अवघ्या दहा मिनिटात निघून गेले होते. त्यामुळे त्याचा मराठवाडा दौरा देखील लांबणीवर पडला आहे. 

इच्छुकांना आता वाट बघावी लागणार 

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, पुर्वाश्रमीचे मनसेतील नेते प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मनसेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पैकी दाशरथे, जाधव, महाजन यांनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. मनसेच्या अधिवेशनात या सर्वांचा प्रवेश होईल असे बोलले जात होते. पण औरंगाबादेतच एखादा मेळावा घेऊन त्यात या सगळ्यांना पक्षात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता राज ठाकरे यांचा मराठवाडा दौराच रद्द झाल्यामुळे या इच्छुकांना आणखी काही दिवस वाट बघावी लागेल.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT