छत्रपती संभाजीनगर

वैद्यकीय परिषदेवर निवड; डॉ. राजेश दरडें सन्मान

CD
LTR19HTP02.jpg लातूर ः महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. राजेश दरडे यांचा आपले आरोग्य आपलीच जबाबदारी फाऊंडेशच्या वतीने सत्कार करण्यात आला. ---- वैद्यकीय परिषदेवर निवडीबद्दल डॉ. दरडेंचा सन्मान --- लातूर, ता. १९ ः महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य म्हणून डॉ. राजेश दरडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आपले आरोग्य - आपलीच जबाबदारी फाउंडेशनच्या वतीने नुकतेच त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने (ता. १५) प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे डॉ. राजेश दरडे यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘आपले आरोग्य - आपलीच जबाबदारी फाउंडेशन’च्या ‘एक व्यक्ती - सहा संकल्प’ या सामाजिक उपक्रमाचेही खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सन्मान केला. ‘उज्ज्वल भविष्य घडवूया’ या संकल्पनेतून रसायनमुक्त शेती, व्यसनमुक्त जीवन, पर्यावरण संरक्षण, कापडी पिशवीचा वापर, दररोज एक तास व्यायाम आणि दरवर्षी पाच झाडांची लागवड हे सहा संकल्प समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावेत, असा संदेश फाउंडेशनच्या माध्यमातून दिला जात आहे. कार्यक्रमास संजय राजुळे, दत्तात्रय परळकर, मारुती माने, शिरीषकुमार शेरखाने, राघवेंद्र देबडवार, संतोष सोनवणे, माधव तरगुडे, वीरभद्र तरगडे व सिद्धेश्वर जगाये यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

SCROLL FOR NEXT