छत्रपती संभाजीनगर

आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत राजीव गांधी कृषी महाविद्यालयाला विजेतेपद

CD
--------- राजीव गांधी कृषी महाविद्यालयास विजेतेपद ---------- आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा; कृषी महाविद्यालय उपविजेते सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.१७ ः तालुक्यातील वरपुड येथे आयोजित मुलांच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद परभणी येथील राजीव गांधी कृषी महाविद्यालयाने तर उपविजेतेपद वनामकृवी अंतर्गत कृषी महाविद्यालयाने पटकावले. वरपुड येथील अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्‍घाटन विद्यापीठाचे संचालक शिक्षण (कृषी) डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते झााले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित वरपुडकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, तांत्रिक अधिकारी डॉ. जी. एम. कोटे, संचालक शिक्षण डॉ. एस. ए. चव्हाण, संस्थेचे सचिव सुशील वरपुडकर, क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सी. एस. डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन राधिका पाटील यांनी केले. या स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे धीरज हिवरे, विलास देशमुख, नितीन चव्हाण, आदिनाथ दुधाटे, तबरेज खान, प्रा. पी.एम. कांबळे, प्रा. पूजा मोरे ,महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. प्रसेनजित बनसोडे, दया कनकुटे, संजय अवरगंड, दुबे आदींनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Numerology: 'तीन तिघाड काम बिघाड' असं का म्हटलं जातं; ३ अंक खरोखरच अशुभ असतो का? पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत; एकनाथ शिंदेंची घोषणा

Train Ticket Booking: तत्काळमध्येही तिकीट मिळत नाही? रेल्वेची ही ट्रिक वापरा, मिळू शकतं कन्फर्म तिकीट!

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

SCROLL FOR NEXT