छत्रपती संभाजीनगर

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत साहेबांकडून अनवाणी धावलेल्या रमाबाई रणवीर यांची दखल

CD
रमाबाई रणवीरांची ‘ती’ धाव पोचली सरन्यायाधीशांपर्यंत --- विधी सेवा प्राधिकरणातर्फे सन्मान, मदत --- ​बीड, ता. ७ : अंबाजोगाई येथे नुकत्याच झालेल्या ‘अमृत दौड’मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून अनवाणी धावलेल्या, तीन हजारांचे पारितोषिक जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची व जिद्दीची कहाणी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यापर्यंत पोचली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या भगिनीला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ​सरन्यायाधीस सूर्य कांत यांच्या सूचनेनुसार ‘राष्ट्रीय विधी सेवा’ने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाशी, तर महाराष्ट्र ‘विधी सेवा’ने बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधला. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वहाब सय्यद यांनी तातडीने रमाबाईंशी संपर्क साधून त्यांना प्राधिकरणाच्या बीड येथील कार्यालयात बोलावून घेतले. ​प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई व त्यांच्या दोन्ही मुलींचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना साडी, कपडे आणि शैक्षणिक साहित्य आदी स्वरूपात मदत देण्यात आली. या सन्मानाने रमाबाई भारावून गेल्या. रमाबाईंची अशी धाव... -- मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील ४७ वर्षीय रमाबाई रणवीर अंबाजोगाईत एका अकादमीत स्वयंपाकाचे काम करतात. अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित ‘अमृत दौड’मध्ये त्या नेहमीच्या पारंपरिक पेहरावात अनवाणी धावल्या होत्या. स्पोर्टस शूज किंवा कसलेही प्रशिक्षण नसताना, हातात स्लीपर धरून साडीचा पदर सांभाळत त्यांनी तीन हजारांचे बक्षीस जिंकले. पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणाचा आणि पोलिस दलात भरती होण्याच्या स्वप्नाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत विजय मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT