छत्रपती संभाजीनगर

धाराशिवमध्ये राष्ट्र सेविका समितीचे शिस्तबद्ध पथसंचलन उत्साहात, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत नागरिकांकडून स्वागत

CD
राष्ट्रसेविका समितीचे पथसंचलन पुष्पवृष्टी करीत शहरवासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता.२८ ः राष्ट्रसेविका समितीच्या वतीने शहरात विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन उत्साहात पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या शिस्तबद्ध संचलनाचे नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा तोडकरी होत्या. जिल्हा कार्यवाहिका वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सेविकांनी देशभक्तीपर वैयक्तिक गीते आणि सामूहिक पद्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उज्ज्वला मसलेकर यांनी ‘प्रभाव से परिवर्तन तक समितीची ९० वर्षे’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की समिती समाजामध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार, समर्पण, समाज प्रबोधन आणि सेवा या पंचसूत्रीवर काम करत आहे. या कार्यातून समाजात मोठे परिवर्तन घडून आले आहे. येणाऱ्या काळातही सेविकांनी राष्ट्र उभारणीसाठी समाज जागृतीचे हे कार्य अधिक वेगाने पुढे नेण्याची गरज आहे. सभेनंतर निघालेल्या पथसंचलनामध्ये घोषपथक, भगवा ध्वज आणि शेकडोच्या संख्येने पूर्ण गणवेशात सहभागी झालेल्या सेविकांचे शिस्तबद्ध पाऊल गणितातील संचलन अतिशय विलोभनीय व स्फूर्तिदायक दिसत होते. हे संचलन आनंदनगर येथील गणपती मंदिर, समता कॉलनी, माननीय हॉस्पिटल आणि दत्त मंदिरमार्गे परत गणपती मंदिर येथे आले. संचलनाच्या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत सेविकांचे स्वागत केले. .......... धाराशिव ः राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित पथसंचलनात सहभागी झालेल्या सेविका. फोटो क्रमांक ःOSM26B07291

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC election results: चार राज्यांतील 28 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला एकही नाही; सत्ता असूनही कर्नाटकात काँग्रेसची धूळधाण

Pune News : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार, टीकेला कामातून उत्तर देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Marathi News Live Updates : पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई; १३ पोलिसांसह २५ जण अटकेत!

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT