Vadapav Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : धक्कादायक! पत्नीच्या वडापावमध्ये पतीने घातले उंदीर मारण्याचे औषध अन्...

एकच धावपळ, आरडाओरड झाल्याने महिलेला मुलासह त्याच्या मित्रांनी घाटीत दाखल केले.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्याचवेळी मुलाने धाव घेत वडिलांच्या तावडीतून आईची सुटका केली. दरम्यान, आईला भुक लागल्याने तिने घरात आणलेला वडापाव खाल्ला.

पण काही तिला वेळातच मळमळ सुरू झाल्याने तिने आरडाओरडा केला. त्यावेळी पतीने वडापावमध्ये उंदीर मारण्याचे औषध घातल्याचे समोर आले. पतीसह तिला मारहाण करणारा दीर, पुतणे त्यांचा मुलगा अशा पाचजणांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ ऑगस्टला तिचा पती शेख इसाक मारहाण करत होता. ते भांडण मुलाने सोडविले. त्यानंतर पतीसह दोन दिर शेख इब्राहिम, शेख याकुब आणि पुतणे शेख युनूस आणि फुरखान यांनी एकत्रित येत महिलेस पुन्हा मारहाण केली. मारहाणीनंतर महिलेस भुक लागल्याने तिने घरात आणलेला वडापाव खाल्ला. काही वेळातच तिला मळमळ होऊ लागल्याने तिने आरडाओरड केली.

पतीला विचारणा केली असता त्याने वडापावमध्ये उंदीर मारण्याचे औषध घातल्याचे सांगितले. दरम्यान एकच धावपळ, आरडाओरड झाल्याने महिलेला मुलासह त्याच्या मित्रांनी घाटीत दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी घाटीत धाव घेत तिचा जबाब घेतला. त्यावरून वरील पाचजणांविरोधात १९ ऑगस्टला गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार राठोड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT