अपात्र रेशनकार्डधारकांचा लाभ बंद
अंमळनेर ः सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत आधार क्रमांकाच्या पडताळणीत परिवहन, वित्त आणि महसूल विभागांच्या माहितीनुसार मिशन सुधार राबवले जात आहे. याअंतर्गत पात्रता निकषात न बसणाऱ्या पाटोदा तालुक्यातील सुमारे ३,८७२ शिधाधारकांचा रेशन लाभ बंद करण्यात आला आहे. यात अडीच एकरांपेक्षा अधिक जमीन, चारचाकी वाहनधारक व आयकरदात्यांचा समावेश आहे. अंमळनेरमधील दोन स्वस्त धान्य दुकानांतील एकूण ९३ लाभार्थ्यांची नावे कमी केली आहेत. तसेच शंभर वर्षांवरील आणि सलग तीन महिने रेशन न उचलणाऱ्या लाभार्थ्यांचीही पडताळणी करून ऑक्टोबर २०२६ पासून त्यांचेही धान्य कायमस्वरूपी बंद केले जाईल. आधार जोडणीद्वारे ही अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी भविष्यातही सतत सुरूच राहणार असल्याची माहिती पाटोदा तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी सैफ मुल्ला यांनी दिली आहे.
-------
दसरा मेळाव्याला उपस्थितीचे आवाहन
अंमळनेर ः विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संत, महंत व नाथभक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या १८ व्या दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मायंबा देवस्थान आयोजकांनी केले आहे. आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील पावनभूमीतील मच्छिंद्रनाथ देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही सदगुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा कार्यक्रम होईल. दिनांक २० रोजी सकाळी दहा वाजता आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा व सीमोल्लंघन पार पडेल.
-----
महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग कौन्सिलवर लाहोटी
परळी वैजनाथ ः महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड अॅग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलवर परळीतील व्यापारी संदीप लाहोटी यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्या कार्याचा अनुभव, व्यावसायिक दृष्टिकोन आणि नेतृत्वगुणांना मान्यता मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठवाड्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.