छत्रपती संभाजीनगर

गावात राहूनही रहिवासाचा पुरावा द्या! धान्य मिळवण्यासाठी एकल महिला, द्विसदस्य कुटुंबांची ससेहोलपट मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या अहवालाचा जाच; रेशनच्या धान्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ

CD
रेशनच्या धान्यासाठी उंबरठे झिजवण्याची वेळ एकल महिला, लहान कुटुंबांची ससेहोलपट; कागदपत्रांच्या जाचामुळे त्रस्त कळंब, ता. ३० (बातमीदार) : शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणारे धान्य गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार आहे. मात्र, एकल महिला आणि दोन सदस्य असलेल्या लहान कुटुंबांना शिधापत्रिका मिळवितानाच प्रशासकीय प्रक्रियेच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. गावात वर्षानुवर्षे वास्तव्यास असूनही रहिवास सिद्ध करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल आणण्याची अट पूर्ण करावी लागत असल्याने या नागरिकांची ससेहोलपट होत आहे. दोन वेळच्या अन्नाची सोय करण्यासाठी धडपडणाऱ्या गरजूंच्या वाट्याला सरकारी कागदपत्रांची धावपळ येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकल महिला आणि दोन सदस्य असलेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अनेकादा हलाखीची असते. अशा कुटुंबांसाठी रेशनवरील धान्य हा केवळ शासकीय लाभ नसून दैनंदिन जगण्याचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर रहिवासाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे जावे लागत आहे. संबंधित अहवाल मिळविण्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत असल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे गावात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनाही आपले वास्तव्य सिद्ध करण्यासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. स्थानिक पातळीवरील शासकीय नोंदी उपलब्ध असताना त्यांचा वापर करून पडताळणी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या एकल महिलांसाठी ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत आहे. एका अर्जदार महिलेने माझ्या कुटुंबात मी आणि माझा मुलगा असे दोघेच असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याचे सांगितले. कुटुंबप्रमुख म्हणून नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र आम्ही याच गावात वास्तव्यास असूनही रहिवास सिद्ध करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालासाठी धावपळ करावी लागत असल्याचे सांगितले. ....................... ((चौकट)) धान्यापेक्षा कागदपत्रांचेच ओझे अधिक गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज आणि सन्मानाने मिळणे अपेक्षित आहे. पात्रता तपासणी आवश्यक असली, तरी त्यासाठीची प्रक्रिया जाचक ठरू नये. उपलब्ध शासकीय नोंदींच्या आधारे पडताळणी करून अनावश्यक कार्यालयीन फेऱ्या टाळण्याची मागणी होत आहे. ........................ ((कोट)) एकल महिला व द्विसदस्य कुटुंबाना शिधापत्रिका देण्यासाठी कुटुंब गावात वास्तव्यास आहे का, यासाठी तलाठी, मंडळअधिकारी यांचे अहवाल मागवणे अनिवार्य आहे. - गोपाळ तापडिया, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग कळंब ................ ((कोट)) ‘एकल महिला व लहान कुटुंबांना शिधापत्रिका देताना त्यांचे आधार कार्ड आणि रास्त भाव दुकानदाराचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास त्याआधारे शिधापत्रिका मिळणे आवश्यक आहे. - किरण बोराडे, सचिव, रास्त भाव दुकानदार संघटना

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसेंना स्वकीयांचंच आव्हान; आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा!

SCROLL FOR NEXT