छत्रपती संभाजीनगर

दुष्काळात गोरगरीबाच्या ताटातील तांदूळही कमी! शेजारी जिल्ह्यांत दोन किलो तांदूळ,धाराशिवमध्ये मात्र एकच किलो; तीन महिन्यांपासून धान्य वाटपात फरक दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर शासनाकडून मीठ; प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी:

CD
पाच महिन्यांपासून धान्य वाटपात बदल शिधापत्रिकाधारकांमधून नाराजीचा सूर कळंब, ता. १० (बातमीदार) : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटाशी झुंज देत असताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वाटपाच्या प्रमाणावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे, सोलापूर, लातूर आणि बीड या शेजारील जिल्ह्यांत प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू वितरित केला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, धाराशिव जिल्ह्यात एक किलो तांदूळ आणि चार किलो गहू दिले जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हा बदल सुरू असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जाते. अनेक कुटुंबांना दैनंदिन आहारासाठी तांदळाची अधिक गरज असते. त्यामुळे तांदळाचे प्रमाण दोन किलोवरून एक किलो झाल्याने अडचणी वाढल्याची भावना लाभार्थी व्यक्त करीत आहेत. गव्हाचे प्रमाण वाढवून तांदळाची घट भरून निघत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. धान्य वाटपाचे प्रमाण बदलण्यामागे कोणता शासन निर्णय आहे, हा बदल कोणी केला आणि शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिवमध्ये वेगळे प्रमाण का लागू आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे. ........................ ((कोट)) रेशनवर तांदळाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक कार्डधारक गहू कमी देऊन तांदूळ वाढवून देण्याची मागणी करतात. मात्र, शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या धान्याचेच नियमानुसार वाटप करावे लागते. प्रमाण बदलण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. - किरण बोराडे, धान्य दुकानदार ..................... ((कोट)) पूर्वी दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू मिळत होता. आता तांदूळ कमी करून गहू वाढविला आहे. आम्हाला गव्हापेक्षा तांदळाची गरज अधिक आहे. - ताई काळे, लाभार्थी, वाकडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress High Command Alert : दिल्लीत काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला पोहोचण्याचे आदेश

एका मृत्यूभोवती गुंफलेलं गूढ, संशयाचं जाळं अन् अनपेक्षित वळणं; अजय पुरकरांचा ‘केस नं. ९९’ येतोय ओटीटीवर

Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

Marathi News Live Updates : तुषार गांधी यांना अटक, आदित्य ठाकरे, संजय राऊत DN नगर पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT