खंडणी sakal
छत्रपती संभाजीनगर

अश्लील चित्रीकरण करून खंडणी वसूली

एकूण १४ लाख रुपये उकळले

सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर - एका महिलेने स्वतःच एकासोबत स्वत:चे अश्लील चित्रीकरण साथीदाराच्या सहाय्याने केले. त्यानंतर त्यास धमकी देत पंधरा लाख रुपये खंडणी वसूल केल्याची घटना घडली आहे.

शहरातील भारत कॉलनीत राहणारी महिला (वय ३०) एका खासगी महाविद्यालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून अस्थायी पदावर काम करते. ही महिला व इतर दोघांनी उदगीर तालुक्यातील सुकणी येथील शेतकऱ्याची (वय ७२) माहिती काढून खंडणीचा सावज शोधला. मागील महिन्यात ते त्यांच्या शेतात गेले व त्यांना मद्य पाजले, दरम्यान अश्लील चित्रीकरण केले. या नंतर ५ मे ते १५ जुन पर्यंत आरोपी असलेल्या दोन इसमांनी आम्ही पोलिस आहोत व तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत पहिल्या वेळी १० लाख, दुस-या वेळी ४ लाख, असे एकूण १४ लाख रुपये मौजे सुकणी, शिरुर ताजबंद व तळेगाव रोड अहमदपूर या ठिकाणी ही खंडणी वसूल केली.

आरोपी महिला व तिचे साथीदार पुन्हा वेळोवेळी पैशांची मागणी करीत राहिल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने अहमदपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर अहमदपूर बस स्थानकात दुपारी चार वाजता ठरलेला एक लाखाचा व्यवहार करीत असताना पोलिसांनी मुसा अल्लाउद्दीन शेख यास रंगेहात पकडले.

या संदर्भात अहमदपूर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.१५) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान मुसा शेख यांनी पोलिसांना सांगितले की मी फक्त पैसे आणायला आलो असून जाकीर गुलाब शेख व ती महिला हे यातील प्रमुख आरोपी आहेत. यामधे रहिम शेख हे ही नाव आले आहे. या घटनेचा सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT