Aurangabad Mahapalika News  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : महापालिकेची १०० कोटींची वसुली

पुढील महिनाभरात कराचे दुपटीने लक्ष्य गाठणार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करून जप्ती, मालमत्ता लिलावाच्या नोटिसा बजावल्या जात असून, नोटीसांच्या धडाक्यामुळे अनेक जण थकीत कर भरत आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सात डिसेंबरला कर वसुलीचा १०० कोटींचा उच्चांक महापालिकेला गाठता आला. पुढील महिनाभरात तब्बल १०० कोटी रुपये वसूल करून २०० व पुढे मार्चअखेरीस ३०० कोटींची कर वसुली करण्याचा मनोदय प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. सात) केला. महापालिकेच्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात ३५० कोटी रुपयांचे मालमत्ता कराचे तर १३० कोटी पाणीपट्टीचे वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

त्यानुसार यंदा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी यंदा मालमत्तांचे ब्लॉक तयार केले असून, प्रत्येक वसुली कर्मचाऱ्यांना ठराविक मालमत्ता वाटून देण्यात आल्या आहेत. असे असले तरी सुरवातीच्या काळात दररोज २५ ते ५० लाखांपर्यंतच वसुली होत होती. त्यामुळे प्रशासकांनी प्रत्येक वसुली कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व कामचुकार कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखविण्यात येईल, असा इशारा दिला.

दरम्यान कर निर्धारक व संकलक तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्यात आल्या. वर्षानुवर्षे नोटिसा बजावल्यानंतरही जे थकबाकीदार कर भरत नाहीत, अशांना मालमत्ता जप्ती व लिलावाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर दररोजची वसुली ७० ते ८० लाखांवर गेली. त्यामुळे यंदा डिसेंबर महिन्यातच महापालिकेने १०० कोटीच्या वसुलीचा आकडा पूर्ण केला आहे.

विद्यापीठाने भरले १९ लाख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गुरुवारी करापोटी १९ लाख ६३ हजार ४०१ रुपयांचा मालमत्ता कराचा भरणा केला. तसेच सावित्री लॉन्सतर्फे सावित्री म्हस्के यांनी ५ लाख ९१ हजार तर शब्बीर पटेल शाळेपोटी जावेद पटेल यांनी ५ लाख ५ हजार रुपयांचा कर भरला. पटेल, म्हस्के यांचा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सत्कार केला. यावेळी प्रभाग एकचे वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, कर्मचारी अविनाश मद्दी, उपायुक्त अपर्णा थेटे, जीएसटी विभागाचे राजीव झाडे, सहाय्यक जाधव, प्रभाग अधिकारी बिरारे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pimpri Chinchwad News : अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’; हिंजवडी–ताथवडे पट्ट्यात महिनाभरात दोघींचा मृत्यू!

Sweetlime Rate Decrease : मोसंबी नऊशे रुपये, तर कापुस सात हजार रुपये प्रति क्विंटल

Gadchiroli Premier League: गडचिरोलीत पुन्हा रंगणार क्रिकेटचा उत्सव; महिला क्रिकेट संघाचाही होणार समावेश!

SCROLL FOR NEXT