Reduce Reuse and Recycle Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation RRR initiative Centers started in nine wards
Reduce Reuse and Recycle Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation RRR initiative Centers started in nine wards sakal
छत्रपती संभाजीनगर

‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या’ ; महापालिकेचा ‘आरआरआर’ उपक्रम; नऊ प्रभागात केंद्रे सुरू

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने आरआरआर ( रेड्युस, रीयुज आणि रिसायकल) म्हणजेच ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नऊ प्रभागात नऊ सेंटर सुरू करण्यात आले आहेत. शहरातील कचरा कमी करण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या शहरी व आवास मंत्रालयातर्फे ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरांमध्ये महापालिकेने आरआरआर सेंटर नऊ प्रभागात उभारले आहेत. प्रभाग एकमध्ये- नारळी बाग,

प्रभाग दोन- काबरा गार्डन, प्रभाग तीन- सेंट्रल नका कार्यालय, प्रभाग चार- नवजीवन कॉलनी, एन-११, प्रभाग पाच- सिडको एन-७, महानगरपालिका पाणी पुरवठा कार्यालय शेजारी, प्रभाग सहा- विठ्ठल नगर, एमआरएफसेंटर, प्रभाग सात- पुंडलिक नगर पाण्याच्या टाकीजवळ,

प्रभाग आठ- कांचनवाडी एमआरएफ सेंटर जवळ, प्रभाग नऊ- रमानगर पाण्याची टाकीजवळ सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या अभियानात नागरिकांना नको असलेल्या म्हणजेच टाकून द्यायच्या वस्तू द्यायच्या व त्यांना हव्या असलेल्या वस्तू सेंटरमधून घेऊन जायच्या ही संकल्पना राबविली जात आहे.

त्यात जुनी पुस्तके, जुने कपडे, खेळणी, भांडे, सायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पादत्राणे, ज्या वस्तूंचा पुनर्वापर करू शकतो, अशा वस्तू नागरिक देऊ शकतात. या सेंटरसाठी प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह घनकचरा विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव, प्रभाग अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

सुदर्शननगर येथे नागरिकांच्या हस्ते उद्‍घाटन

शनिवारी सकाळी हडको एन -११, सुदर्शननगर येथे सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, माजी नगरसेवक किशोर नागरे, श्री. काळे, संतोष सूर्यवंशी, लिंबाजी चाबुकस्वार, रामराव म्हस्के, श्रीरंग भावसार, सुभाष जोजारे, पी. वी. जाधव, दामोदर जाधव, प्रशांत भदाने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी स्वच्छता निरीक्षक सुहास भाले, अशोक चावरिया, प्रसाद दांडगे, सतीश दाभाडे, जवान राजेंद्र खरात, सुरेश बोर्डे, विजय साबळे, नंदलाल बुंदीले, राजेश थोरात, मधुकर म्हस्के, अजय नागे, कैलास बकले, कैलास साळवे, किशोर शेजूळ, सागर रगडे, जयश्री रगडे, लताबाई बनकर यांच्यासह महापालिका कर्मचारी, बचतगट सफाई मजूर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT