छत्रपती संभाजीनगर

गंगापूर येथे रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न ३०० वाहनांना बसवले रेड रिफ्लेक्टर.

CD
तीनशे वाहनांना बसवले रिफ्लेक्टर - गंगापूर कृषी बाजार समितीत रस्ता सुरक्षा प्रबोधन गंगापूर, ता. ३० (बातमीदार) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), वैजापूर यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम गुरुवारी (ता. २९) झाला. वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर लावणे गरजेचे असून, या उपक्रमांतर्गत ३०० ट्रॅक्टर-ट्रॉली, पिकअप व इतर वाहनांना लाल परावर्तक (रेड रिफ्लेक्टर) बसवण्यात आले. यावेळी ५०० हून अधिक शेतकरी, चालक, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे व जि. प. सदस्या दीपाली मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संदीप निमसे यांनी रस्ता सुरक्षेचे गांभीर्य, वाहतुकीचे नियम, समृद्धी महामार्गावरील लेनची शिस्त, टेल लॅम्पचे महत्त्व तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे व परवान्याबाबत सविस्तर माहिती दिली. बाजार समितीचे सहाय्यक सचिव विजय हिवाळे, रवींद्र मस्के, सोनल गावित, धनंजय गावित व पूजा कुच्चे यांनीही रस्ता सुरक्षेवर विचार मांडले. परिसरातील सर्व वाहनधारकांनी व शेतकऱ्यांनी वाहनांना रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले. कार्यक्रमासाठी वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Marathi News Live Updates : रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको

RailMadad: प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का? जाणून घ्या काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT