छत्रपती संभाजीनगर

माहिती एका क्लिकवर

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...मेन -- फोटो क्रमांक : 31687 - एआय इमेज , फोटो क्रमांक : 31688 - महावितरण मोबाईल ॲपवरील ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ हा नवीन पर्याय. -- नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर! -- महावितरणच्या मोबाईल ॲपवर सुविधा; शेतकऱ्यांसह सर्व वीजग्राहकांना दिलासा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : राज्यातील प्रामुख्याने शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणत्याही भागातील नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) माहिती थेट ‘महावितरण मोबाईल अ‍ॅप’द्वारे एका क्लिकवर देण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नादुरुस्त रोहित्र ताबडतोब बदलणे किंवा दुरुस्त करणे लवकर शक्य होणार आहे. - या ॲपद्वारे कोणालाही कोणत्याही ठिकाणच्या नादुरुस्त रोहित्राची माहिती देता येईल, हे विशेष. यासह महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईटवर किंवा कॉल सेंटरमध्ये देखील तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणने नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तथापि नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले. त्याची नोंद घेत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्यासाठी नागरिकांना ‘महावितरण मोबाईल ॲप’द्वारे खास सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ही सुविधा ॲपवर कार्यान्वित झाली आहे. - महावितरणकडून राज्यभरातील नऊ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे (डीटीसी) जिओ लोकेशनसह मॅपींग पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ लोकेशनच्या आधारे नादुरुस्त रोहित्रांची माहिती देणे कोणालाही ‘महावितरण मोबाईल ॲप’द्वारे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हे ॲप डाऊनलोड केलेल्या सर्व मोबाईलधारकास कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्याची सोय मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी ‘प्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपल स्टोअर’वर उपलब्ध आहे.  - अशी नोंदवा तक्रार नादुरुस्त रोहित्र्याची माहिती देण्यासाठी ग्राहकाने संबंधित रोहित्र्याच्या ठिकाणाजवळ असणे आवश्यक आहे. ॲपमधील ‘नादुरुस्त रोहित्रांची माहिती नोंदवा’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन सुरू करावे लागेल. लॉगिन नसल्यास नाव व व्हाट्सॲप क्रमांक देऊन ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागेल. यानंतर नादुरुस्त रोहित्राचा फोटो काढून तो ॲपवर अपलोड करता येईल. नकाशावर अक्षांश- रेखांशसह संबंधित रोहित्र्याचे नाव व डीटीसी क्रमांक दिसेल. योग्य रोहित्र निवडून ‘नोंद करा’ हा पर्याय दाबल्यानंतर तक्रार संबंधित अभियंता व जनमित्रांपर्यंत तातडीने पोहोचेल. - १४-१ ..चौकट.. १४-१ बदलाची माहितीही मिळणार महावितरणच्या वेबसाईट किंवा कॉल सेंटरद्वारे तक्रारीची सोय- मोबाईल ॲपसोबतच नादुरुस्त रोहित्राची तक्रार किंवा माहिती देण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर, संबंधित कार्यालय किंवा ग्राहक सुविधा केंद्रामध्ये किंवा २४ तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५/ १८००२३३३४३५ / १९१२ किंवा १९१२० या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्राहक रकान्यात जाऊन ‘ऑनलाइन तक्रार नोंदवा’मध्ये ग्राहक क्रमांकाशी संबंधित रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदविता येईल. यासह या वेबसाईट किंवा महावितरण मोबाईल ॲपवरील ‘ऊर्जा चॅट बॉट’द्वारे देखील इतर तक्रारींसोबतच मराठी व इंग्रजी संवादाद्वारे तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT