Raj Thackeray Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेचा अहवाल जाणार गृहमंत्रालयात

४५ मिनीटांचे भाषण पोलिसांनी ऐकले पाच तास!

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (ता. १) औरंगाबादेत जाहीर सभा झाली. या सभेचा अहवाल गृह मंत्रालयाने मागविला आहे. विशेष म्हणजे, शहर पोलीस दलाने ठाकरेंच्या सभेला १६ अटी-शर्तींवर परवानगी दिली होती. याचे उल्लंघन झाले की नाही? याचा अहवाल पोलीस आयुक्त गृह मंत्रालयाला पाठविणार आहेत. याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता.२) पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते यांनी सायबर शाखेत पाच तास बसून राज यांचे ४५ मिनिटांचे भाषण ऐकले. त्यानंतर अहवाल बनविण्याचे काम सुरु झाले होते.

काय होत्या अटी, शर्ती

  • सभेत महिला व पुरुषांची स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, तेथे स्वच्छता असावी. स्वच्छतागृहाचीही सोय करावी.

  • कोणतीही व्यक्ती किंवा समुदायाचा अनादार होईल, असे वक्तव्य टाळा.

  • सभास्थानाची आसनव्यवस्था १५ हजार नागरिकांची असल्याने त्यापेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करू नये.

  • सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये.

  • सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.

  • धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी.

असे झाले उल्लंघन

  • महिलांची आसन व्यवस्था स्वतंत्र नव्हती. महिलांना पुरुषांच्या गर्दीतूनच ये-जा करावी लागली.

  • दोन धर्मांच्या नागरिकांमध्ये कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी सभेतून केले.

  • सभेला ३० ते ३५ हजार नागरिकांची उपस्थिती होती. विशेष शाखेने ही आकडेवारी अहवालात नोंदविली.

  • भोंगे उतरविण्यासाठी ४ मेचा अल्टीमेटम देताना काय ते एकदा होऊनच जाऊ द्या, असे तरुणांना भडकविणारे वक्तव्य.

  • सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदुषणाच्या अटी पायदळी तुडविल्या. डेसीबलचा आकडा हा ८४ पर्यंत होता.

  • दोन धर्मांमध्ये विष कालविण्याचे काम या जाहीर सभेतून उघडपणे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atharva Sudame: “महिला प्रवाशांच्या प्रतिष्ठेला हानी…”; पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस, ही रील ठरली कारण

Latest Marathi News Live Update : महायुतीची कोल्‍हापुरात आज 'शंखनाद विजयाचा' सभा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

बिनविरोधसाठी खून, माघारीच्या शेवटच्या दिवशी राडा; मतदानाआधीच ६७ जण विजयी, भाजपचे सर्वाधिक

Pune Airport : प्रवाशांना दिलासा; पुणे विमानतळावर ‘ग्रीन चॅनेल’, ४० ते ५० मिनिटांची होणार बचत

MSRTC New Bus Pass Scheme: रोज बसने प्रवास करताय? मग MSRTC ची नवीन पास योजना जाणून घ्या, प्रवास होईल एकदमभारी!

SCROLL FOR NEXT