kesar Mango Sakal
छत्रपती संभाजीनगर

Kesar Mango: केसरच्या क्लोनिंगसाठी संशोधनावर भर, हिमायतबागेतील फळ संशोधन केंद्रात हजारो रोपांची निर्मिती

सध्या बागेत केसर आंब्याची क्लोनिंग (संकरित) पद्धतीने निर्मिती करण्यावर संशोधन सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्रतीक्षा शिंदे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या हिमायतबाग फळ संशोधन केंद्रात हजारो रोपांची निर्मिती करण्यात आली असून, त्यावर संशोधन केले जात आहे.

दरम्यान, सध्या बागेत केसर आंब्याची क्लोनिंग (संकरित) पद्धतीने निर्मिती करण्यावर संशोधन सुरू आहे. दरवर्षी यात वार्षिक उत्पन्न दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवणे, हा उद्देश असल्याचे प्रा.डॉ.जी.एम. वाघमारे यांनी सांगितले.

सुमारे ३०० एकर क्षेत्रफळ असलेल्या हिमायतबागेत तब्बल एक लाख ८० हजार झाडे व रोपे लावलेली आहेत. पन्नास हजार रोपे रोपवाटिकेत आहेत. त्याचबरोबर दहा हजार चिंच, पाच हजार सीताफळ, पाच हजार पेरू व साठ हजार इतर कलमे विक्रीसाठी आहेत. याचबरोबर बागेत कविट, पेरू, चिकू, मोसंबी, जांभूळ अशी एकूण ५२ प्रजातींची फळे आणि इतर शोभिवंत झाडे आहेत.

आंबा रोपांची बाग वेधते लक्ष

बागेचे खास वैशिष्ट्य असणारे केसर आंबे लोकांचे विशेष लक्ष वेधतात. एकूण दहा हेक्टर क्षेत्रफळामध्ये या आंबा बागेची लागवड केलेली आहे. बागेतील कुठलेही फळ हे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जाते. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्याचा लिलाव केला जातो.

बागेतील उत्पादनाचे वार्षिक उत्पन्न एकूण ४० ते ४५ लाख इतके आहे. बागेत केसर आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असून, दरवर्षी उन्हाळ्यात बागेतच विक्रीसाठी स्टॉल लावलेले असतात. यात फक्त हिमायतबागेतीलच आंबे विक्रीसाठी असतात. संपूर्ण भारतात आंब्याच्या एकूण १ हजार २९१ प्रजाती आहेत. त्यापैकी फक्त वीस प्रजाती महाराष्ट्राच्या पाच विभागांपैकी व्यावसायिक दृष्टीने उपयोगी पडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT