छत्रपती संभाजीनगर

निवृत्त शिक्षकाला घातला साडेसात लाखांचा गंडा

CD
निवृत्त शिक्षकाला घातला साडेसात लाखांचा गंडा ----- डिजिटल अरेस्ट : दूरसंचार, सीबीआय अधिकारी असल्याचे भासविले ----- उदगीर, ता. ३१ (बातमीदार) : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवत एका ७२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची सात लाख ५० हजार ४७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल २० दिवस त्यांच्यावर व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवण्यात आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हाची अंजली शर्मा, सुनील कुमार गौतम, प्रदीप सिंग या नावांनी ओळख सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील निडेबन येथील संत कबीरनगरातील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत अमृतराव काकनाळे यांना १० सप्टेंबरला एका अनोळखी मोबाइलवरून फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने आपण दिल्लीतील दूरसंचार विभागातील अंजली शर्मा असल्याचे सांगितले. त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून दुसरे सिम कार्ड घेतल्याची माहिती देत ते बंद करण्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपण दिल्लीतील सीबीआयचे अधिकारी सुनील कुमार गौतम असल्याचे सांगितले. संदीप कुमार यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात काकनाळे यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत त्यांच्या आधार कार्डचा वापर करून दिल्लीतील आयसीआयसीआय बँक खाते उघडण्यात आल्याचे आणि त्यातून सहा कोटी २० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट काढल्याची भीती दाखविली. तद्‍नंतर आरबीआयच्या पत्राचा फोटो पाठवून बँक खात्यांची माहिती मागविण्यात आली. सुनील कुमार गौतम आणि प्रदीप सिंग या नावांनी ओळख सांगणाऱ्या व्यक्तींनी पोलिसांच्या वेशात दररोज व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावर नजर ठेवली. सर्व बँक खात्यातील रक्कम एसबीआय खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. पैशाची तपासणी करून १० दिवसांत रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिले. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगून कोणालाही माहिती देऊ नये, अशी ताकीदही दिली. या प्रकरणामुळे घाबरलेल्या काकनाळे यांनी २४ सप्टेंबर रोजी आरबीआय बँकेच्या पुण्यातील खराडी शाखेतील खात्यावर तीन लाख २३ रुपये ५० पैसे, तर नऊ ऑक्टोबरला बँक ऑफ इंडियाच्या मोडूळ शाखेतील खात्यावर चार लाख २७ हजार २३ रुपये ६० पैसे आरटीजीएसद्वारे पाठविले. त्यांनी एकूण सात लाख ५० हजार ४७ रुपये संबंधितांनी दिलेल्या खात्यावर जमा केले. १२ ऑक्टोबरनंतर संबंधितांकडून फोन येणे बंद झाले. त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाइल बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार केली. त्यानंतर पोलिसांत धाव घेतली. येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डी.डी. गाडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT