छत्रपती संभाजीनगर

‘फिट फॉर लाईफ’च्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

CD
‘फिट फॉर लाइफ’च्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव जवळा बाजार ः येथील ‘फिट फॉर लाइफ’ ग्रुपच्या वतीने बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तसेच परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा शनिवारी (ता. ५) सकाळी साडेदहाला इंदिरा गांधी कन्या विद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त गौरव करण्यात आला. ‘फिट फॉर लाइफ’ हा ग्रुप सामाजिक जाण ठेवून विविध सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होत असतो. जवळा बाजार परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती कॅप्टन सत्यनारायण सोनी यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी कन्या विद्यालयाचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा मुळे राहणार असून, सेवानिवृत्तांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर पटेल, कोषाध्यक्ष डॉ. रमेश नवले, भारतीय स्टेट बँक, आसोला शाखेचे शाखाधिकारी गिरीश रामटेके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगराव माऊली कदम, सचिव विक्रम शिंदे, सहसचिव प्रा. गजानन मुळे, संदीप कदम, अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष बी.डी. कदम, मारोतराव सातपुते, शशिकांत गुजर, साहेबराव शिंदे, विष्णूभाऊ कुटाफळे, हैदर टेलर यांच्यासह ‘फिट फॉर लाइफ’चे सर्व सदस्य व बाराशिव शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

Talegaon Dhamdhere Leopard Attack: तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT