Crime News 
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhjinagar : वहिणीला विमानाने घेऊ जावू का? असा का म्हटला, म्हणत रिक्षा चालकाला बेदम मारहाण

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकाला ‘चार दिवसांपूर्वी माझ्या वहिणीला लवकर जायचे होते, तर तु विमानाने घेऊन जाऊ का? असे का बोलला असे म्हणत चौघांनी रिक्षाचालकाला धावता रिक्षा थांबवून बेदम मारहाण केली.

ही घटना २१ जून रोजी मोंढा उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी रिक्षाचालक अशोक भाऊसाहेब ढाकणे (३२, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार अशोक हे रिक्षाचालक आहेत. ते रिक्षात प्रवाशी बसवून मोंढा नाका परिसरातून जात असताना चौघांनी रिक्षा अडवित आणि चार दिवसांपूर्वी बोललेल्या कारणावरुन अशोक यांना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीने मारहाण केली,

दरम्यान रिक्षातील प्रवाशांनाही मारहाण केली, यात प्रवाशाचे डोके फुटले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार मेघना कुलकर्णी या करत आहेत.

जून्या भांडणातून कटरने वार

जून्या भांडणातून व्यापारी तरुणावर दोघांनी कटरने वार करुन चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. ही घटना २१ जून रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान पवननगर, रांजणगाव येथे घडली.

याप्रकरणी रोहण तारूकर (१९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार जून्या भांडणातून त्याला फैजान खान जावेद खान (२०) आणि अमोल कुबेर (२१, रा. दोघेही रांजणगाव) या दोघांनी रोहन याच्या ओठावर कटरने मारुन चामड्याच्या पट्ट्याने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक अधाने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT