Gas Cylinder Sakal
छत्रपती संभाजीनगर

गॅस महागल्यानं आता हॉटेलिंगही महागणार

महागाईचा वणवा पेटत चालल्याची वर्दी देणारी आणखी एक बातमी पुढे येत आहे.‌ औरंगाबादेतील हॉटेलमधील जेवण आता महागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

महागाईचा वणवा पेटत चालल्याची वर्दी देणारी आणखी एक बातमी पुढे येत आहे.‌ औरंगाबादेतील हॉटेलमधील जेवण आता महागणार आहे.

औरंगाबाद - महागाईचा वणवा पेटत चालल्याची वर्दी देणारी आणखी एक बातमी पुढे येत आहे.‌ औरंगाबादेतील हॉटेलमधील जेवण आता महागणार आहे.

कोविडच्या नंतर विविध वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे औरंगाबादकराचे हॉटेलिंग महागणार असल्याच्या माहितीला औरंगाबाद हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की कोविडनंतर आमच्या जवळपास ९० टक्के व्यवसायांवर वाईट परिणाम झाला आहे. हा उद्योग चालवणे जिकिरीचे बनले आहे. सर्वच वस्तुंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय चालवणे आम्हाला परवडेनासे झाले आहे.

पेट्रोल, डिझेल, भाज्या, नॉनव्हेज या आमच्याशी संबंधित सर्वच वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत. आता व्यापारी गॅस सिलिंडरच्या दरात (२३५५ रुपये) वाढ झाली आहे. याआधीही या किंमती सिलेंडर मागे २६८ रुपयांनी मागच्याच महिन्यात वाढल्या होत्या. कोळसा, भाज्या, लिंबू यांचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे आम्हाला जेवणाच्या दरात २० ते २५ टक्के वाढ करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT