छत्रपती संभाजीनगर

महागाईने ग्रामीण अर्थव्यवस्था

CD
महागाई वाढली; शेतमालाला अपेक्षित दर मिळेना जळकोट, ता. १६ (बातमीदार) : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांसह शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खते, बियाणे, औषधे, मजुरी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना शेतमालाला मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून, त्याचा परिणाम विविध वस्तूंच्या किमतींवर होत आहे. एलपीजी, सीएनजी तसेच विविध सेवा शुल्कांतील वाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचन, मशागत आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. दुसरीकडे द्राक्ष, केळी, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, ऊस, हळद, आले, भुईमूग आणि भाजीपाल्यासारख्या पिकांना अनेकदा उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. वाढती महागाई, पाण्याची टंचाई आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. बाजारात ग्राहकांना भाजीपाला व धान्य महाग दराने खरेदी करावे लागत असले तरी त्याचा पुरेसा लाभ उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील व्यापारी व दलालांच्या साखळीमुळे शेतमालाच्या दरात मोठी तफावत निर्माण होत असल्याची नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT