छत्रपती संभाजीनगर

विकसित भारत’च्या कामांत कोट्यवधींचा घोटाळा? बोगस हजेरी, कागदोपत्री कामे अन् ७/१२ मध्ये फेरफार केल्याचा आरोप; आरपीआय (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत आक्रमक:

CD
‘रोहयो’च्या कामांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? एसआयटी चौकशीची मागणी; अन्नत्याग आंदोलनाचा इशारा कळंब, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यात ‘विकसित भारत’ रोजगार हमी योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा संघटित भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप आरपीआय (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केला आहे. मजूर प्रत्यक्ष कामावर नसतानाही बोगस हजेरी दाखविणे, कागदोपत्री रस्त्यांची कामे दाखवून निधी लाटणे तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पात्रतेचे निकष डावलून विहिरी मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ३० दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे. रोहयोच्या कामांवर मजुरांची एनएमएमएस प्रणालीद्वारे सकाळी व दुपारी हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. मात्र, मजूर प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही बनावट फोटो अथवा ॲपच्या माध्यमातून हजेरी दाखवून बोगस मस्टर तयार केले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तालुक्यातील काही रस्त्यांच्या कामांमध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा कागदोपत्री काम अधिक दाखवून बिले काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून मोजमाप पुस्तिका, मस्टर रोल, डिजिटल हजेरीचा डेटा व देयकांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT