railway recruitment 
छत्रपती संभाजीनगर

RRC Recruitment 2021: दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून सविस्तर माहिती

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) एक नोटिफिकेशन काढून मध्य रेल्वेत अप्रेंटेसिप भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे 2 हजार 532 रिक्त पदांची  भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. यासाठीची शिक्षण पात्रता दहावी पास असणं गरजेचं आहे. ही भरती पुणे, मुंबई, सोलापूर, नागपूर व भुसावळ या मख्य स्थानकांसाठी तसेच मनमाड वर्कशॉप, परळ वर्कशॉप, मुंबई कल्याण डीजल शेडसाठी आहे.

एकूण रिक्त पदे- 2 हजार 532 

पदांबद्दलची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-
कॅरेज आणि वेगन- 258
मुंबई कल्याण डिझल शेड- 53
कुर्ला डीजल शेड- 60
सीनियर DEE (TRS) कल्याण- 179
सीनियर DEE (TRS) कुर्ला- 192
परळ वर्कशॉप- 418
माटुंगा वर्कशॉप- 547
S&T वर्कशॉप, बायखळा: 60

पात्रता-
या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेची अट ही दहावी पास असणे गरजेचे आहे. यामध्ये मान्यताप्राप्त बोर्डातून कमीतकमी 50 टक्के मार्क मिळवलेले असावेत.
तसेच राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेची मान्यता असलेले ट्रेड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा- अर्जदाराचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असणं गरजेचे आहे. 

निवड प्रक्रिया-
ही थेट नियुक्ती प्रक्रिया असून यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.

अर्ज शुल्क-
सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांसाठी 100 रुपये शुल्क असणार आहे. त्याचबरोबर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि महिला अर्जदारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा-
ज्यांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी www.rrcer.com या लिंकवर जावा. ऑनलाईल अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या. महत्त्वाची कागदपत्रे आणि योग्य माहिती भरा. तसेच योग्य मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा, कारण यावरच तुम्हाला संपर्क केला जाऊ शकतो. https://www.rrccr.com/PDF-Files/Act_Appr/Act_Appr_2020-21.pdf

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT