छत्रपती संभाजीनगर

धावडा येथे संघाचे पथसंचलन उत्साहात

CD
ABD26J82033 धावडा ः येथे शनिवारी रात्री पथसंचलन करताना संघाचे स्वयंसेवक. ...... धावडा येथे संघाचे पथसंचलन उत्साहात धावडा, ता.२४ : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन शनिवारी (ता.२३) रात्री उत्साहात पार पडले. गावातील प्रमुख मार्गांवरून हे पथसंचलन काढण्यात आले. विठ्ठल मंदिर, धनगर गल्ली, बालाजी मंदिर, जगदंबा चौक, जुनी ग्रामपंचायत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि मोठी वेस या मार्गाने संचलन करण्यात आले. त्यानंतर गणपती मंदिर मंगल कार्यालय येथे पथसंचलनाची सांगता झाली. येथे प्रमुख वक्ते व पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. सेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा सहकार्यवाह अशोक कादे यांनी राष्ट्रभक्ती आणि संघाच्या नियमित शाखेचे महत्त्व विशद केले. स्वयंसेवकांनी दररोज शाखेत उपस्थित राहून प्रार्थना व मैदानी खेळांच्या माध्यमातून शरीर सुदृढ ठेवावे. राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि आई-वडिलांची सेवा करून राष्ट्राप्रती समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर पथसंचलन यशस्वी करण्यासाठी तालुका संघचालक डॉ. संजय भोंबे, जिल्हा शारीरिक प्रमुख भगवान राऊत, शंकरराव घुले, शालिक शिंदे, सोमनाथ अनवेकर, मनीष बोडके, विलासराव काका देशपांडे, एकनाथ नरवडे, डॉ. विसपुते आणि आकाश लोखंडे यांनी पुढाकार घेतला.

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT