छत्रपती संभाजीनगर

माहिती अधिकार सप्ताहाचा समारोपमाहिती अधिकार सप्ताहाचा समारोप

CD
‘अधिकाऱ्यांनीच शिकावा माहिती अधिकार कायदा’ छत्रपती संभाजीनगर, ता. १३ ः माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतुदी आणि नियमांची योग्य माहिती असल्यास विहित मुदतीत माहिती उपलब्ध करून देताना अडचणी येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जन माहिती अधिकाऱ्यांनी अगोदर हा कायदा शिकावा, असे आवाहन राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे उपसचिव राजाराम सरवदे यांनी केले. राज्य माहिती आयोगाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यातर्फे ६ ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह पार पडला. या सप्ताहाचा समारोप भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सोमवारी (ता.१२) झाला. यावेळी सरवदे बोलत होते. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक संग्राम जोगदंड, उपअधीक्षक नीलेश उंडे, भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीच्या उपप्राचार्य स्वाती लोंडे, नायब तहसीलदार आर. आर. जोहरी, कक्ष अधिकारी एम. एम. परदेशी, एस. बी. डाखोळे, सहायक कक्ष अधिकारी व्ही. डी. शिंदे, कास्ट्राईब संघटनेचे सरचिटणीस आर.एम. कांबळे आदी उपस्थित होते. तसेच भूमी अभिलेख विभागातील जन माहिती अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. ---- महाभूमी पोर्टलवर वेळोवेळी माहिती अपलोड ः जोगदंड भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक संग्राम जोगदंड म्हणाले की, काही वेळा एकाच अर्जाद्वारे मोठ्या प्रमाणात माहिती मागितली जाते. भूमी अभिलेख विभागाचे अभिलेख ‘महाभूमी’ या वेब पोर्टलवर वेळोवेळी अपलोड केले जातात. वेब पोर्टलवरील माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवल्याने नागरिकांना आवश्यक माहिती मिळविणे सुलभ होते. तसेच प्रशासनाला पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा देण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

Pune News : गंभीर आजारी वडिलांचे पालकत्व मुलीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पेरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा आधार

SCROLL FOR NEXT