NND26B04007 नांदेड : ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाअंतर्गत धावताना धावपटू.
---
‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
नांदेड : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात शनिवारी (ता. ३१) राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नांदेड येथे ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडचे आयोजन करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासह राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या एकता दौडमध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सी. एच. कल्याण राजू, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. श्रीनिवास, विविध विभागांचे शाखाधिकारी तसेच रेल्वे कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करणे, तसेच त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि देशाप्रती कर्तव्यभावना जोपासण्याचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.