Russian company in the land allocation certificate Auric  Auranagabad News
Russian company in the land allocation certificate Auric Auranagabad News  
छत्रपती संभाजीनगर

"ऑरिक अपडेट : रशियन कंपनीला मिळाले जमीन वाटपाचे प्रमाणपत्र

प्रकाश बनकर

औरंगाबाद : रशियातील सर्वांत मोठी स्टील कंपनी असलेल्या ‘नोव्होलिपेत्सक स्टील’च्या (एनएलएमके) ‘ऑरिक’मधील मेगा प्रकल्पासाठी २७ जुलैला ४३ एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. सोमवारी (ता.तीन) या कंपनीला जमिनीचे प्रमाणपत्र देण्यात आले. महिनाभरात ही कंपनी या जागेचे पैसे भरत पुढील प्रक्रिया करणार आहे, अशी माहिती ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी शनिवारी (ता.आठ) दिली. 

‘एनएलएमके’ ही रशियन कंपनी ऑरिकमध्ये दोन टप्प्यांत पाच हजार ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीने बिडकीन-शेंद्रा येथे प्रकल्प उभारणीसाठी तयारी दर्शवली होती. यासंदर्भात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ऑरिकचा कंपनीसोबत सामंजस्य करारही (एमओयू) करण्यात आला. त्यानंतर या कंपनीने जागेसाठीची पाच टक्के टोकन रक्कम भरली होती. त्यानंतर या कंपनीस जमीन वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले. 

जगभरात ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे स्पेशलाईज्ड स्टील ‘एनएलएमके’ तयार करते. जगभरात लागणाऱ्या स्टीलपैकी ६० टक्के उत्पादन ही कंपनी करते. भारतातही ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे विशिष्ट स्टील आयात केले जाते. ऑरिकमध्ये ही कंपनी सुरू झाल्यानंतर आयातीवर फार अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

 दोन टप्प्यात करणार पाच हजार ८०० कोटींची गुंतवणूक

ही कंपनी ऑरिकमध्ये पाच हजार ८०० कोटींची दोन टप्प्यांत गुंतवणूक करणार आहे. पहिल्या टप्प्यात ८०० तर दुसऱ्या टप्प्यात पाच हजार कोटी अशी गुंतवणूक राहणार आहे. या कंपनीमुळे नवीन आठ ते दहा व्हेंडर्स तयार होतील. शिवाय ५०० हून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. सोमवारी कंपनीला जमीन वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित जमिनीचे पैसे भरत कंपनीतर्फे पहिल्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे, असेही श्री. काटकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT