राष्ट्रीय शालेय ज्युडो स्पर्धेत
सई सापते हिची सुवर्णकमाई
जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ७ : ७० व्या राष्ट्रीय शालेय ज्युडो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याची खेळाडू सई सापते हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच आरंभ शिंदे याने या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सई सापते व आरंभ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे व जिद्दीचे कौतुक केले तसेच आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असून, त्यांच्या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळत आहे. खेळाडूंनी भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, योगेश थोरबोले, गणेश सापते, राजेश भवाळ आदी उपस्थित होते.
......
धाराशिव ः ७० व्या राष्ट्रीय शालेय ज्युडो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार.
....
फोटो क्रमांक ःOSM26B07347
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.