छत्रपती संभाजीनगर

कर्तृत्वाला सामाजिक बांधिलकीची जोड गरजेची

CD
लातूर ः सलगरा येथे विविध विकास कामाचे लोकार्पण झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, विश्वजित गायकवाड, अश्वजित गायकवाड आदी. कर्तृत्वाला सामाजिक बांधिलकीची जोड गरजेची ------- जिल्हाधिकारी बास्टेवाड : डॉ. अनिलकुमार गायकवाडांच्या कामाचे कौतुक सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ९ ः आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाचा ठसा उमटवतानाच आपल्या मातीशी आणि नात्यांशी असलेली नाळ घट्ट जपणारे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा ‘इंटरनॅशनल रोड फेडरेशन’चे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. कर्तृत्वाला सामाजिक बांधिलकी जोड देत त्यांनी सुरु केलेले काम कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी व्यक्त केले. सलगरा येथे देविदास गुरधाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. गायकवाड यांनी पुढाकार घेत गणपती विसर्जन घाट, अस्थी विसर्जन घाट, धोबीघाट, शिवमंदिर, सभागृह, उद्यान अशा विविध विकासकामांची उभारणी केली आहे. या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ८२ रोपांची लागवड करण्यात आली. डॉ. गायकवाड यांच्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्वाच्या तुलनेत हे कार्य खूपच लहान आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान भूमिपुत्राच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी समाजाने त्यांच्यासमोर आणखी मोठ्या विकास संकल्पना मांडल्या पाहिजेत. आपल्या माणसांसाठी धावून येणारा असा माणूस मिळणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे डॉ. बास्टेवाड म्हणाले. माणूस पदाने किंवा पैशाने कितीही मोठा झाला, तरी त्याने आपली माणसे आणि नाती विसरता कामा नयेत. खरी श्रीमंती पदात नसून नात्यांमध्ये आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यात असते. देविदास गुरधाळे यांच्या विचारांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे, असे डॉ. गायकवाड म्हणाले. याप्रसंगी माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, गिरीश प्रभुणे, जयश्री गायकवाड, प्रियंका गायकवाड, अभिजीत गायकवाड, विश्वजित गायकवाड, सरपंच शांता साळुंके, महादेव साळुंके, अनुरुथ गव्हाडे, सेवांकूडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपरत्न निलंगेकर यांनी केले. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT