Sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : ‘ॲमेझॉन’ला घातला ११ लाखांचा गंडा;महागडे पार्सल मागवून वस्तू बदलत करायचे कंपनीला परत

ॲमेझॉन ई-कॉमर्स कंपनीला तब्बल ११ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रविवारी (ता. २३) न्यू उस्मानपुरा भागात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ॲमेझॉन ई-कॉमर्स कंपनीला तब्बल ११ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रविवारी (ता. २३) न्यू उस्मानपुरा भागात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. हे दोघे महागड्या इलेक्ट्रिक वस्तू अपूर्ण आणि बनावट नावाने खोट्या पत्त्यावर मागवीत होते. नंतर पार्सलमधील वस्तू बदलून काही कारण दाखवीत कंपनीला त्या परत पाठवीत होते. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

चिकलठाणा एमआयडीसी येथील ॲमेझॉन कंपनीचे स्टेशन मॅनेजर मंगेश अहेलाजी कान्हे (वय ३३, रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः त्यांच्या अंतर्गत असलेल्या कामगारांकडे ग्राहकांचे पार्सल पोचविण्याचे काम आहे. शुक्रवारी (ता. २१) सकाळी कामगार ज्ञानेश्वर कळम यांच्याकडे दोन पार्सल देण्यात आले होते. या पार्सलमध्ये १० लाख ९६ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य होते. हे पार्सल अतुल आणि संजय अशा अपूर्ण नावाने होते. दोन्हींवर जाबिंदा प्राइम, न्यू उस्मानपुरा असा एकच पत्ता होता. कळम यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन संबंधित क्रमांकावर कॉल केला.

पार्सल घेण्यासाठी दोन तरुण आले. यापैकी एकाने पार्सल घेतले. दुसरा तरुण कळम यांच्याशी बोलत उभा राहिला. काही वेळाने पार्सल नेलेल्या तरुणाने पार्सल परत आणून देत ‘‘माझा मोबाइल बंद आहे. कंपनीकडून आलेला ओटीपी देता येणार नाही, तुम्ही उद्या या!’’, असे सांगितले. यामुळे कळम यांनी पार्सल कंपनीच्या गोदामामध्ये आणून जमा केले. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातून तक्रारदार कान्हे यांना कॉल आला. त्यांनी दोन्ही पार्सलची माहिती घेतली. शिवाय यापूर्वी अशाच प्रकारे परत आलेल्या पार्सलमध्ये दुसऱ्या वस्तू निघाल्याचे सांगितले. त्यावर कान्हे यांनी पार्सल तपासले. या पार्सलवर जुनी चिठ्ठी आणि आतमध्ये कंपनीने पाठविलेल्या इलेक्ट्रिक टोस्टरऐवजी निकृष्ट दर्जाचे मिक्सर निघाले.

असे अडकले जाळ्यात

या भामट्यांनी कळम यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितले होते. यामुळे मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. कळम यांनी पुन्हा भामट्यांना कॉल लावला. भामट्यांनी त्यांना जाबिंदा प्राइम परिसरात बोलावले. कळम हे पार्सल घेऊन त्या ठिकाणी गेले. उर्वरित कर्मचारी त्यांच्या आजूबाजूला होते. हे दोन भामटे पार्सल घेण्यासाठी पुन्हा आले असता, त्यांना सर्वांनी मिळून पकडले. नंतर उस्मानपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. नौमान नौशाद मुल्ला (वय २४) आणि नूर शेख शहजाद (वय २४, दोघेही रा. मुंब्रा, ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT