abdul sattar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जिल्हा बॅंक अध्यक्षपदी अर्जून गाढे बिनविरोध

त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्‍यक्षपदी बँकेचे उपाध्यक्ष असलेले अर्जून गाढे पाटील यांची सोमवारी (ता.११) बिनविरोध निवड झाली. आता उपाध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे अधिसूचना निघून निवडणूक होण्याची शक्यता आहे.

एक ऑगस्टपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी जवळपास एक महिना अकरा दिवसानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. अनेकजण अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र, सर्वांना बाजूला सारत अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचे कट्टर समर्थक अर्जून गाढे यांची बिनविरोध वर्णी लावून घेतली. यासाठी गेल्या दोन दिवसापासून संचालक, भाजप-शिवसेना, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी काम पाहिले. सकाळी साडे अकरा वाजता निवडीची प्रक्रिया सुरु झाली. अध्यक्षपदासाठी केवळ अर्जुनराव गाढे यांचे तीन अर्ज आले.

त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. विशेष म्हणजे, अर्जुनराव गाढे यांच्यासाठी माजी अध्यक्ष नितीन पाटील, संचालक कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील, जावेद पाटेल, डॉ.दिनेश परदेशी, जगन्नाथ काळे हे सुचक-अनुमोदक होते. तर विशेष सभेस संचालक अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, नितीन पाटील, कृष्णा पाटील, अप्पासाहेब पाटील, सुहास शिरसाट, मनोज राठोड, सुरेखा काळे, जगन्नाथ काळे, अभिषेक जैस्वाल, डॉ. सतीश गायकवाड, ॲड.देवयानी पाटील, मंदाबाई माने, पार्वतीबाई जाधव उपस्थित होते. पालकमंत्री संदीपान भुमरे, अंबादास दानवे गैरहजर होते.

उपाध्यक्षपदासाठी होणार निवडणूक

जिल्हा बँकेत पक्षभेद विसरुन शेतकरी, व्यापारी, कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत बँक सर्वांच्या सहकार्याने समर्थपणे चालवणार आहे. अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकला याबद्दल मी आभार व्यक्त करतो.

अर्जुनराव गाढे, अध्यक्ष जिल्हा बँक

सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाला याचा मनस्वी आनंद आहे. अर्जुन गाढे पाटील यांच्या रूपाने सिल्लोड तालुक्याला पहिल्यांदा चेअरमनपदाचा बहुमान मिळाला. जिल्हा बँक शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर आहे. याचे पावित्र्य जपणे, शेतकरी, व्यापारी यांना न्याय देण्यासह जिल्हा बँकेला शिखरावर नेण्यास गाढे पाटील कमी पडणार नाहीत.

अब्दुल सत्तार, अल्पसंख्याक मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT