raid esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : बजाजनगर परिसरात कुंटणखान्यावर छापा

हॉटेलचालक, मॅनेजर, एजंटासह ग्राहकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून हॉटेल चालक, मॅनेजर व ग्राहक यांच्यासह चार पीडित महिलांना ताब्यात घेऊन हॉटेलमधून जवळजवळ अर्ध्या लाखाचे साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी (ता.१५) बजाजनगर येथे करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः ओम साई हॉटेल, कोलगेट चौकाजवळील लॉजवर ४ ते ५ महिला देहव्यापार करत असून मदत पाठवा, अशी माहिती मिळाल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री होताच तेथे गुरुवारी (ता.१५) दुपारी छापा टाकला. त्यावेळी हॉटेल-लॉज चालविणाऱ्यासह मॅनेजर, ग्राहक आणणारा एजंट हे महिलांना वेश्यागमन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करताना आढळले. या प्रकरणी गणेश रामभाऊ सागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटनखाना चालविणाऱ्यासह, हॉटेल मॅनेजर, एजंट असे तीन पुरूष व वेश्यागमनासाठी आलेला ग्राहक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

कुंटणखाना चालविणारा अप्पासाहेब महादेव खेडकर, (वय ४६, रा. साईश्रध्दा पार्क हौ.सो., बजाजनगर), मॅनेजर निळकंठ बाळासाहेब शिंगणे, (वय ४२, रा. लाडनांद्रा, ता. सेलु, जि. परभणी, ह.मु. ओम साई हॉटेल, कोलगेट चौक), एजंट योगेश भोजु जाधव, (वय २५) ह.मु. देवळाई चौक, सेवालालनगर), ग्राहक धरमसिंग महाजन जंघाळे (वय २७, रा. पाचपीरवाडी, ता. गंगापूर, (ह.मु. पोलीस काँलनी, पडेगाव) व पिडीत महिलांचा समावेश आहे.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन छाप्यात मिळून आलेले साहित्य व ५१ हजार २०० रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोउपनि. चेतन ओगले, अविनाश ढगे, गणेश सागरे, पंकज साळवे, सुरेश भिसे, महिला पोलीस प्रियंका तळवंदे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT