sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : लेकीला भेटण्यासाठी आलेल्या वृद्धेला लुटले

वृद्धेला रिक्षात बसवून देण्याच्या बहाण्याने लूटत तिच्या  पिशवीतील ३० हजार रुपयांची पोत चोरल्याचा प्रकार समोर आला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : येथील हडको भागात राहणाऱ्या लेकीला भेटण्यासाठी जालना जिल्ह्यातून शहरात आलेल्या वृद्धेला रिक्षात बसवून देण्याच्या बहाण्याने लूटत तिच्या  पिशवीतील ३० हजार रुपयांची पोत चोरल्याचा प्रकार समोर आला. ही घटना २७ जुलै रोजी सकाळी ११.३० दरम्यान चंपा चौक भागातील एका हॉस्पिटल परिसरात घडली.

बायाबाई गणेश भुरेवाल (८०, रा. काळी कुडती, आहेरगेटजवळ, ता. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील हडको भागात राहणाऱ्या त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी आल्या होत्या.  शहागंज गांधी पुतळा परिसरातून त्या ॲटोरिक्षात बसल्या. त्या रिक्षाचालकाने वृद्धेला  चांदणी चौकात सोडले.

दरम्यान बायाबाई दुसऱ्या रिक्षाची वाट पाहत असताना एक संशयित तिथे आला, त्याने वृद्धेला कुठे जायचे आहे, अशी विचारणा करत ‘आजी, येथे रिक्षा थांबत नाहीत. तुम्ही माझ्यासोबत चला, मी रिक्षात बसवून देतो’ असे म्हणाला. संशयित वृद्धा चंपा चौक, कैसर काॅलनीतील गल्ली क्र. एक येथील जुलेखा हॉस्पिटल पर्यंत गेले.

दरम्यान वृद्धा थकल्याने खाली बसली असता संशयितही तिच्यासोबत खाली बसला. त्याचवेळेस संशयिताने संधी साधत वृद्धेची नजर चुकवून तिच्या पिशवीतील सहा ग्रॅम वजनाची ३० हजार रुपये किंमतीची पोत घेऊन पळून गेला. दरम्यान, घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नाही म्हणत महिलेला एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आणि घटनेच्या दोन दिवसानंतर घटनास्थळ पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. अधिक तपास हवालदार नागोराव घुगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणे परिसरात आज हलक्या पावसाची शक्यता

MLA Niwas Canteen : आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ‘क्लीन चिट’

माेठी बातमी! 'वसंतराव मानकुमरे अन् आमदार शशिकांत शिंदेंमध्ये कमराबंद चर्चा'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात चर्चांना उधाण..

ISRO Space Mission : भारताचे २०४० पर्यंत चांद्रभूमीवर पाऊल, ‘इस्रो’चा निर्धार; अवकाशस्थानकाच्या उभारणीला वेग

मोठी बातमी! रेशन दुकानातून आता मिळणार मोफत ज्वारी; बुलडाण्यावरून आली ज्वारी; पूरग्रस्तांना दिवाळीसाठी गहू-तांदळासोबत फक्त तीन किलो तूरडाळ

SCROLL FOR NEXT