Sambhaji Nagar
Sambhaji Nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : मुख्यमंत्र्यांच्या सहीविना अडला सव्वाचारशे कोटींचा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहर सेप्टिक टॅंकमुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय ड्रेनेज प्रकल्प राबविले जाणार आहेत. यातील पश्‍चिम मतदारसंघातील प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असली तरी पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघातील कामाची निविदा प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शासनाने ‘पूर्व’साठी २३१ कोटी व ‘मध्य’साठी १९०.४७ कोटींचा प्रकल्प नगरोत्थान योजनेतून मंजूर केला आहे; पण त्यावर मुख्यमंत्र्यांची सही झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. शहर परिसरातील अनेक भागांत आजही ड्रेनेजलाइन नाहीत. मालमत्ताधारक सांडपाणी रस्त्यावर सोडतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहर सेप्टिक टँकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीन विधानसभा मतदारसंघनिहाय ड्रेनेज प्रकल्प राबविले जाणार आहेत. काही वर्षांपूर्वी सातारा-देवळाईसाठी २७५ कोटींचा ड्रेनेज प्रकल्प अमृत-२ मधून मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत काम सुरू आहे. दरम्यान, पडेगाव-मिटमिटा भागासाठी पुन्हा १९६ कोटींच्या प्रकल्पाला अमृत-२ मधून मंजूर करण्यात आला.

दरम्यान, पूर्वसाठी २३१ कोटी, मध्यसाठी १९०.४७ कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले होते. या प्रस्तावाला शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर दोन्ही योजनांना उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली, पण मुख्यमंत्र्यांची मंजुरी शिल्लक आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१० वर्षात १३०० कोटींची कामे

महापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाच्या निधीतून ४६४ कोटींची भूमिगत गटार योजना राबविली होती. त्यानंतर सातारा-देवळाईसाठी २७५ तसेच पडेगाव, मिटमिटा भागासाठी १९६ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघासाठी ४६१ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT