पोलिस कोठडी sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar crime : वकिलास मारहाण करून घर जाळण्याचा प्रयत्न ;तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी

न्यायालयात सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी युक्तिवाद केला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वकीलास बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून घर, दुचाकीही जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींपैकी तिघांना सातारा पोलिसांनी रविवारी (ता. १८) अटक केली. आरोपींना २० जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांनी दिले.

दत्ता तुकाराम शिंदे (वय ३१, रा. भिंदोन, अडगाव), विशाल दादाराव देवकाते (वय २२, रा.दत्तनगर, कांचनवाडी) आणि शोहेब हमीद अली (वय २५, रा. लक्ष्मी कॉलनी, अशोकनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

किरण प्रकाश राजपूत (३२, रा. बीड बायपास) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील आरोपींसह त्यांच्या अन्य साथीदारांनी सात मे रोजी किरण यांच्या घरावर हल्ला केला. तलवार, लाकडी दांडा, पेट्रोलची बॉटलसह आलेल्या सदर संशयितांनी किरण यांना तू आमच्याविरुद्ध केसेस करतो काय? असे म्हणत बेदम मारहाण केली. त्यांच्या कपाटातील रोख ३० हजार रुपये काढून घेतले.

यातील एकाने दुचाकीवर (क्र. एमएच-२०- डीआर- १४४७) आणि घरातील दरवाजाच्या बाजूला जमिनीवर पेट्रोल ओतून आग लावली. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी विशाल देवकाते, दत्ता शिंदे व शोहेब अली यांना अटक केली.

आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT