Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar: ठेवीदाराचा अजिंठा को-ऑपरेटिव बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

जाधव मंडी येथील मुख्य शाखेत हा प्रकार दुपारी एक ते दीड वाजे दरम्यान घडला.

- प्रकाश बनकर

छत्रपती संभाजीनगर - अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँकेत वर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर बुधवारी तारीख 30 ऑगस्ट रोजी ग्राहकांनी मुख्य शाखा जाधव मंडी व उस्मानपुरा येथे गर्दी केली होती. दरम्यान एका ग्राहकाने थेट पेट्रोल आणून अंगावर होतात आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले.

जाधव मंडी येथील मुख्य शाखेत हा प्रकार दुपारी एक ते दीड वाजे दरम्यान घडला. हेमंत गंगवाल असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खातेदाराचे नाव आहे.

दरम्यान बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी त्या खातेदारास भेट घालून त्याची समजूत काढली व सर्वांची पैसे परत करणार असल्याचे आश्वासन दिले त्यानंतर संतप्त झालेल्या गंगवाल हा शांत झाला. आठवड्याभराची मुदत देऊन तो परत घरी निघून गेला.

दरम्यान यामुळे मोठा गोंधळ बँकेत उडाला होता. मात्र अध्यक्षांनी समजूत काढल्यानंतर सर्वजण शांत झाले.

रिझर्व बँकेने आमच्या बँकेवर निर्बंध लादले आहेत याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतो माझ्या बँकेतील सर्व ठेवीदार चे पैसा परत देण्यात येईल. गेल्या पंचवीस वर्षापासून बँक ही व्यवस्थित चालू आहेत.

बँकेवर आतापर्यंत कुठलाही आरोप नव्हता कुठलाही घोटाळा बँकेने केलेला नाही कोणताही दंड आरबीआय ने आतापर्यंत केलेला नाही मात्र त्यांनी झालेले निर्बंध च्या नियमानुसार आम्ही त्याचे पालन करणार व सहा महिन्यात आम्ही आमची बँक पूर्ववत करू.

पाच लाखापर्यंत विमा च्या माध्यमातून जवळपास 95 टक्के खातेदारांना पैसे परत मिळणार आहेत. तीन महिन्याच्या आत पाच लाखापर्यंत ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील.

ज्या लोकांची अडचण आली त्यांना वैयक्तिकरित्या मी जबाबदारी घेत त्यांचे पैसे परत करेन एवढा आम्ही विश्वासही ग्राहकांना देत आहे.यासंदर्भात सकाळपासून आम्ही ग्राहकांशी संवाद साधत आहे.व त्यांना विश्वास देत आहेत की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत.

- सुभाष झांबड, अध्यक्ष, अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT