Sambhaji Nagar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : पावसाअभावी वाळलं अन् ‘लष्कर’ने संपवलं

खरीप पिकाची अवस्था बिकट, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

नवनाथ इधाटे

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पावसाअभावी पिके वाळू लागली आहे. एकीकडे पावसाअभावी पिके वाळले तर दुसरीकडे मका पिकावर लष्कर अळीने संपवलं. अशी परिस्थिती असून यामुळे बळिराजा संकटात सापडला आहे.

फुलंब्री तालुक्यामध्ये सुमारे ५७ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाची पेरणी उशिरा झाली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या झाल्यामुळे पिकाची वाढ अद्याप कमीच आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली. रिमझिम पावसावरच तालुक्यातील पिके तग धरून उभी होती. जुलै महिना संपूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे खरिपाच्या पिकात किडीने हल्ला केला.

ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असल्यामुळे या किड्यांनी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून विशेषतः मका पिकावरील लष्करी अळीमुळे जवळपास पीक हातातून गेल्यात जमा आहे.

गत गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण कमी होऊन उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे दिवसभर पडणाऱ्या उन्हात पिके वाळू लागले आहे. खरिपातील पिके वाळल्यामुळे महागडी बियाणे आणून लागवड केल्यानंतर महागडे रासायनिक खते व औषधी फवारणी करण्यावर शेतकऱ्यांनी आता भर दिला आहे. परंतु पावसाचे प्रमाण नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे.

खरिपातील पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असून येत्या आठ दिवसात पाऊस न पडल्यास खरिपातील संपूर्ण पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नही गंभीर होणार असल्याने त्याबाबत प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

फुलंब्री तालुक्यात यावर्षी एकही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे खरिपातील पिकांची अवस्था बिकट झालेली आहे. खरिपाची पेरणी केल्यानंतर रिमझिम पावसावरच पिके उभे असल्याने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : मंगळुरू कुकर स्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीकला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT