students private vehicle sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : शिक्षणासाठी जीवघेणी कसरत ; पालकांचा संताप

कन्नड आगाराच्या बस थांबत नसल्याने नाइलाजाने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांत आपला जीव

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : तालुक्यातील भराडी येथील विद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कन्नड आगाराच्या बस थांबत नसल्याने नाइलाजाने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांत आपला जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कन्नड आगाराच्या बस चालकांना थांबण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी विद्यार्थी तसेच पालक यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भराडी (ता.सिल्लोड) येथे जिल्हा परिषद प्रशालेसह अनेक खासगी शाळा, महाविद्यालये आहेत. याठिकाणी परिसरातील दहा ते पंधरा गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. वार्षिक परिक्षा सुरु असून वेळेवर शाळेत पोहचावे लागते. त्यामुळे मिळेल त्या वाहनांना हात देऊन जीवघेणी कसरत करीत विद्यार्थी शाळा गाठत आहे.

विशेष म्हणजे सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावरून धावणाऱ्या अनेक बस सकाळी थांबे घेत नाही. यामध्ये कन्नड आगाराच्या सकाळी येणाऱ्या बस येथे थांबत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता शिक्षकांनी कन्नड आगाराच्या बस थांबत नसल्याच्या तोंडी तक्रारी अनेक वेळा सिल्लोड आगाराकडे केल्या परंतु कुणीही दखल घेतली नाही.

यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, तू काय सांगतोस; मी २ वर्ष संघाबाहेर होतो! Ishan Kishan पत्रकारांसमोर असं का म्हणाला? अभिषेक शर्मासोबतचा Video Viral

Ambethan News : पिंपरी खुर्द येथील आगीत चार घरे जळून खाक; आदिवासी ठाकर बांधवावर दुःखाचा डोंगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षकांचा मनमानी कारभार; अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नोकरीला रामराम, नागरिकांचाही तीव्र संताप

Konkan Mango Crisis : कोकणचा कणा असलेला आंबा संकटात; ९० टक्के मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल

T20 World Cup नंतर टीम इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार का? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT