Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

त्यामुळे त्यांनी स्थानिक सोसायटीचे ६५ हजार रुपये कर्ज घेतले होते.

सकाळ डिजिटल टीम

Sambhaji Nagar - तालुक्यातील वानेगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. गिरधर लक्ष्मण गायकवाड (७२) असे मृताचे नाव आहे.

शेतकरी गिरधर गायकवाड यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. त्यांनी २०२० मध्ये फुलंब्री तालुक्यातील देवगिरी नागरी बँकेकडून सव्वा लाखाचे कर्ज घेतलेले होते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेने शेतीतून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावून कर्जाचा डोंगर वाढत चालला होता.

त्यामुळे त्यांनी स्थानिक सोसायटीचे ६५ हजार रुपये कर्ज घेतले होते. अशातच कर्जाची रक्कम न भरल्याने देवगिरी बँकेने वसुलीची नोटीस पाठविली होती. या नोटीसवरून गिरधर अडचणीत सापडले होते. कर्ज फेडता येत नसल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेत सोमवारी घराजवळील विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. गिरधर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

अधिकाऱ्यांनी दिले लेखी पत्र

पालकांची संतप्त भूमिका आणि त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार अखेर शिक्षण विभागाला करावा लागला आहे. शिक्षण विभागाने सद्यस्थितीला तात्पुरते शिक्षकाची नियुक्ती केल्याचे पालकांना सांगितले. तसेच लवकरच कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक केली जाईल, अशा आशयाचे लेखी पत्रही विभागाने पालाकांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT