Sambhaji Nagar esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar: अखेर तिला न्याय मिळाला! मुलासमोर आईवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १४ वर्षे सक्तमजुरी शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर: विवाहितेसह तिच्या मुलाचे अपहरण करून एका पडक्या घरात नेत मुलासमोरच विवाहितेला मारहाण करीत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार २०१८ साली घडला होता.

याप्रकरणातील अत्याचार करणाऱ्या नराधमाला १४ वर्ष सक्तमजुरी आणि विविध कलमाखाली २१ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी (ता.३०) रोजी ठोठावली.

चरण प्रेमसिंग सुलावणे (२५, रा. सुलीभंजन ता. खुलताबाद) असे त्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणूण पिडेतेला देण्याचे तसेच विधी व न्याय विभागाने देखील योग्य तो मोबदला पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

प्रकरणात २४ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी तथा तत्कालीन सहायक निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

त्यात पीडितेसह वैद्यकिय पुरावे महत्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी चरणला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ २ एम अन्वये १४ वर्षे सक्तमजुरी दहा हजार रुपये दंड, कलम ३५४ डी आय अन्वये दोन वर्षाेंचा कारावास, तीन हजार रूपये दंड.

कलम ३३७ अन्वये ५०० रूपये दंड, कलम ३२४ अन्वये एक वर्षे कारावास एक हजार रूपये दंड, कलम ३४१ अन्वये ५०० रूपये दंड, कलम ३४६ अन्वये सहा महिने करावास, कलम ३६५ अन्वये दोन वर्षे कारावास एक हजार रूपये दंड.

कलम ३६६ अन्वये दोन वर्षे कारावास तीन हजार रूपये दंड, कलम ३२६ आणि ५०४ अन्वये प्रत्येकी पाचशे रूपये दंड आणि कलम ५०६ अन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आरोपीची सरकारी वकिलासह पोलिसांना धमकी

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सरकारी वकील मुंडवाडकर हे न्यायालयाच्या कक्षेतून बाहेर आले. त्यावेळी आरोपीने त्यांना आवाज देऊन, जेलमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला बघून घेईल अशी धमकी दिली.

आरोपी हा गुन्ह्याच्या सवयीचा असल्याने त्याने पोलिसांना देखील अरेरावी करित धमकी दिल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT