crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : तरुणीच्या डोक्यात बिअरच्या बॉटलने वार

हॉटेलवर मित्राला बोलावणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अश्लील शेरेबाजी केल्याने संतापलेल्या तरुणीने तरुणाच्या कानशिलात लगावल्यानंतर तरुणाने चक्क तिच्या डोक्यात बिअरची बॉटलने वार केल्याने या हल्ल्यात २६ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मार्चच्या रात्री पावणे दहा वाजेदरम्यान विमानतळासमोरील हॉटेल निसर्ग येथे घडली. याप्रकरणी तरुणाविरुध्द एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल पंढरी राठोड (वय २६, रा. जयभवानीनगर, गल्‍ली क्र.२, मुळ रा. शेळवणी, ता.देगलूर, जि.नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तर भारत शेसु जाधव (३७, रा. चिकलठाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सदर तरुणीच्या फिर्यादीनुसार ३१ मार्चच्या रात्री साडेसात वाजेदरम्यान २८ वर्षीय मैत्रिणीसोबत विमानतळ परिसरातील निसर्ग हॉटेलमध्ये गेले होते. दरम्यान शितल हिने मित्र सोमिनाथला जेवणासाठी बोलाविले. तो आठ वाजता आल्यानंतर त्याच्यासोबत तिघेजण आलेले होते. त्यावेळी सोमिनाथने मित्रांना शीतलची ओळख करुन देत असतानाच सोमिनाथला मित्र ‘तु हिच्या नादी कशाला लागला’ म्हणतात शीतलविषयी अश्लील शेरेबाजी केली.

दरम्यान, शीतलने रागाच्या भरात शेरेबाजी करणाऱ्या सोमिनाथच्या मित्राच्या कानशिलत लगावली. यानंतर कानशिलात लगावल्याचा राग मनात धरुन सदर तरुणाने शीतलच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडून जखमी केले. शीतलच्या मैत्रिणीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर शीतलने दुसरा मित्र सोनू खंडागळे (रा. दिवाण देवडी) याला बोलावून घेत पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर सोमिनाथच्या मित्राविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हवालदार राजधर शेजूळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना का दिली स्थगिती? परिवहनमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण...

Lemon Price Hike: उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबू महाग, एका लिंबाची 'इतकी' किंमत

Latest Marathi News Live Update: कोल्हापूरमध्ये कोर्टातच वकिलाला मारहाण

Pune News : ‘एचपीव्‍ही’लसीकरणास महापालिकेच्‍या दवाखान्‍यांत सुरवात; महापालिकेला मिळाले १९ हजार लसीचे डोस

स्वयंपाकघरात उतरल्या 'तिघी'; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

SCROLL FOR NEXT