Mobile Calling New Rule Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar: हॅलो तुमचा मुलगा शाळेत का येत नाही?, महापालिका शाळांतील शिक्षकांचे फोन...

यातून तब्बल दोन आठवडे गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्याला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर - हॅलो... तुमचा मुलगा शाळेत का येत नाही? अशी विचारणा करणारा फोन एखाद्या पालकाला चक्क महापालिकेच्या शाळेतून आला तर...! होय आता हा प्रयोग महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

जे विद्यार्थी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहतील, त्यांच्या घरी थेट फोन करून त्याबद्दल अशी विचारणा केली जात आहे. यातून तब्बल दोन आठवडे गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्याला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश येत आहे.

महापालिकेच्या सर्व शाळांत ‘स्मार्ट स्कूल टू, बेस्ट स्कूल’ प्रकल्प राबविला जात आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत ‘गुरु ॲप’ देण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून सर्व शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी ऑनलाइन करण्यात आली आहे.

सतत गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क केला जात आहे. सिडको एन-७ येथील शाळेतील गैरहजर विद्यार्थ्यांची यादी प्रशासकांनी पाहिली असता, लंकेश शिरसाट हा विद्यार्थी दोन आठवडे गैरहजर होता. तो शाळेत का येत नाही, अशी त्याच्या मित्राला प्रशासकांनी विचारले.

त्यावर तो घरातून शाळेसाठी म्हणून निघतो पण दुसऱ्याच मित्रांसोबत जातो, अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार त्याच्या आईला फोन लावला असता तो ऐकत नसल्याचे तिने सांगितले.

त्यामुळे शिक्षक गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे, समुपदेशक डॉ. संदीप शिसोदेसह वर्गशिक्षक श्री. जाधव व श्रीमती देशमुख यांनी विद्यार्थ्याच्या घरी आंबेडकर नगर येथे भेट दिली. त्याला विश्वासात घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर तो शाळेत यायला तयार झाला आणि मी यापुढे कधीच शाळा बुडवणार नाही, असे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : मध्यरात्री भरधाव ट्रकची कारला भीषण धडक; पुण्यात बाप-लेकीसह मेहुण्याचा जागीच अंत, 'ती' भेट ठरली अखेरची...

SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

Supe Baramati History : बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन

Maharashtra Revenue Department : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

SCROLL FOR NEXT