गावात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : जांभाळा-पेकळवाडी ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद : जांभाळा (ता.गंगापूर) पेकळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर गुरुवारी (ता.९) पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील जांभाळा, पोटूळ, पेकलवाडी गावात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून तब्बल पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी ग्रामपंचायत मार्फत दिल्या जात असल्याने महिला संतप्त झाल्या व गुरुवारी (ता.९) महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत निषेध नोंदविला.

ग्रामपंचायतीमध्ये पिण्याचे पाण्याचे आरो प्लांट आहे. त्याद्वारे अल्प शुल्क घेऊन पाणी वितरण करण्यात येते. परंतु जवळपास एक महिन्यापासून आरो प्लांट बंद असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने गुरुवारी सकाळी गावातील पन्नास ते साठ संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीकडे मोर्चा वळविला. पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने खेद व्यक्त केला.

याच बरोबर सार्वजनिक नळांना सुद्धा वेळेवर पाणी पुरवठा नसल्याचे महिलांचे म्हणणे होते. या समस्येकडे ग्रामसेवक, सरपंच लक्ष देत नसल्याचे महिला म्हणाल्या.

यावेळी आरो प्लान दुरुस्ती करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली. यावेळी सचिन मंजुळ, उपसरपंच सुरेखा दाणे, आसेफ शेख, ग्राम सदस्य सुशीला गेलोद, तंटा मुक्ती अध्यक्ष इक्राम शेख, शफीक रशीद शेख, लताबाई दाणे, अर्चना दाने, जिजाबाई बनकर, बिजलाबाई बनकर, वंदना दाणे, सफिया शेख, रजिया शेख, हिराबाई तावणे, पूजा पवार, नयना गेलोद, शिंदुबाई सपकाळ, अमिना शेख आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आषाढी वारीत यंदा पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली! जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची माहिती; ५५० मोबाईल अन्‌ यंत्रणेसाठी तीन कोटींचा खर्च, वाचा...

IND vs ENG Test: पहिल्या दिवशी लॉर्ड्सवर अटीतटीचा थरार; मानधना, हरमनप्रीत अन् दीप्तीची अर्धशतकं, इंग्लंड २६४ धावांनी पिछाडीवर

सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी! हमालाच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणं चोरणारे दोघे जेरबंद; ६ महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत महिलेचे दागिने चोरी, पोलिसांनी तो चोरटा पकडलाच, वाचा...

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2026

SCROLL FOR NEXT