siddharth zoo sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : नव्या प्राणिसंग्रहालयात येणार ‘जंगलाचा राजा’

वर्षभरात होणार सफारी पार्कचे काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत मिटमिटा भागात शंभर एकरावर सफारी पार्क विकसित केले जात आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणार असून, महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय याठिकाणी हलविले जाणार आहे. नव्या प्राणिसंग्रहालयात सिंह आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले पिंजरे यामुळे वादात सापडले होते. या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द केली होती.

त्यानंतर हे प्राणिसंग्रहालय लवकरच मिटमिटा भागात स्थलांतरित करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेने दिली. त्यानुसार नव्याने परवानगी देण्यात आली. दरम्यान स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करून मिटमिटा भागात १०० एकरावर प्राणिसंग्रहालयउ

भारले जात आहे. या कामाची डिसेंबरअखेरची मुदत आहे. या मुदतीत काम पूर्ण झाल्यास पुढील वर्षी महापालिकेचे प्राणिसंग्रहालय मिटमिटा भागात जाईल. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवे प्राणी आणले जाणार आहेत. त्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गुजरातमधील जुनागढ प्राणिसंग्रहालयात मोठ्या संख्येने सिंह आहेत. त्यामुळे महापालिकेला जुनागढ येथून सिंह मिळू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

१२ वर्षापूर्वी होते सिंह

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात तीन सिंह होते. त्यातील एक नर व दोन मादी होत्या. पण त्यांचे प्रजनन करण्यास प्राणिसंग्रहालयाला परवानगी नव्हती. दरम्यान वयोवृद्ध झालेले हे तीनही सिंह मृत्यूमुखी पडले. आता नव्या प्राणिसंग्रहालयात छत्रपती संभाजीनगरकरांना सिंहाचे दर्शन होऊ शकते.

प्राण्यांची संख्या दुपटीने वाढणार

प्राणिसंग्रहालयात सध्या पिवळे वाघ-९, पांढरे वाघ-३, बिबटे-२, कोल्हे-२, नीलगाय-४, सांबर-४६, काळवीट-५१, चितळ-६, मगर-४, माकड-५, उदबिल्ला-१, इमू-१, मोर-३, पानपक्षी-१९, चांदणी कासव-४१, साप-९९ या प्रमाणे प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालय मिटमिटा भागात स्थलांतरित झाल्यानंतर प्राण्यांसाठीची जागा वाढणार आहे. त्यामुळे प्राण्यांची संख्या दुपटीने वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT